विशालनगरचे विद्रूपीकरण थांबवा
वाकड -विशालनगर येथे गणपती चौक आणि डीपी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकामधील खांबावर असलेले जाहिरात फलक अनेक दिवस तसेच आहेत. रस्त्यावरील हे विद्रुपीकरण थांबविले पाहिजे. महापालिकेने दखल घेणे आवश्यक आहे.
- गोविंद गायकवाड, विशालनगर
PNE25V49855
झाडांच्या फांद्या त्वरीत उचला
चऱ्होली बुद्रूक येथील श्री वाघेश्वर महाराज क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या छाटल्यानंतर त्या जागेवरच पडून आहेत. त्यामुळे तेथे कचऱ्याचा ढीग साचला असून परिसर अस्वच्छ झाला आहे. साप व इतर विषारी प्राणी परिसरात दिसू लागले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कृपया छाटलेल्या झाडांच्या फांद्या व कचरा हटवून परिसर स्वच्छ करून द्यावा.
- निर्गुण थोरे, चऱ्होली बुद्रूक
PNE25V49858
धोकादायक खड्डे लवकर बुजवा
चिखली-मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सीजवळील एसएनबीपी स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खूप दिवसांपासून एक खड्डा आहे. या रस्त्यावरून एसएनबीपी, इनोव्हेटिव्ह, सिटी प्राईड, प्रियदर्शिनी स्कूलची लहान मुले व नागरिक रोज ये- जा करत असतात. या मानवनिर्मित खड्ड्यात पाय जाऊन गंभीर अपघात होऊ शकतो. तरी संबंधित विभागाने लवकरात लवकर हा मानवनिर्मित खड्डा बुजवावा किंवा झाकण लावावे.
- डॉ. सचिन राजे, चिखली मोशी
PNE25V49860
ग्रेड सेपरेटरचा एक्झिट गैरसोयीचा
निगडी, प्राधिकरण, यमुनानगरला जाण्यासाठी ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठी आकुर्डी चौकापुढे एक्झिट आहे.
तेथून तुळजाभवानी मंदिरासमोर वाहने बाहेर पडतात. निगडी, प्राधिकरण, यमुनानगरला जाण्यासाठी सेवा रस्त्यावरून जावे लागते. या रस्त्यावर मंदिर, भुयारी मार्ग, पेट्रोल पंप, दुकाने असल्यामुळे नेहमी वर्दळ असते. त्या मुळे सेवा रस्त्यावर रहदारी वाढून किरकोळ अपघात होत असतात. निगडीकडे जाणारे वाहने जास्त प्रमाणात असल्यामुळे हा एक्झिट आधीप्रमाणे निगडी उड्डाणपुलाच्या आधी करावा.
- सागर डुबल, यमुनानगर, निगडी
PNE25V49859
झाडांच्या फांद्याची छाटणी करा
छत्रपती बँकेसमोर असणाऱ्या रस्त्यावरील दिवे झाडांच्या फांद्यामुळे झाकले गेले आहेत. त्यामुळे रस्ता पूर्णपणे अंधारमय झाला असून चोरट्यांकडून तेथून जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र अथवा सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न होऊ शकतो. किंवा अन्य प्रकार घडू शकतात ते टाळण्यासाठी कृपया झाडांच्या फांद्याची छाटणी केल्यास रस्ता प्रकाशमय होईल.
- विशाल पांडे, वाकड
PNE25V49856