पिंपरी-चिंचवड

‘नक्षत्राचं देणं काव्यमंच’तर्फे विविध पुरस्कार

CD

पिंपरी,ता. १६ ः नक्षत्राचं देणं काव्यमंच या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय श्रावणी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे उद्‍घाटन नितीन लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, लेखक, रामचंद्र पंडित होते. नक्षत्राचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, श्रीकांत चौगुले, डॉ. अलका नाईक, सुलभा चव्हाण, अंजू सोनवणे, योगेश बाहेती उपस्थित होते. विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. राजेंद्र झुंजारराव व सुप्रसिद्ध कवी उत्तम सदाकाळ यांना कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सुनील बिराजदार, नवनाथ पोकळे, बालाजी थोरात, भाऊसाहेब आढाव यांना कविरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुभाष चव्हाण यांना नक्षत्र राज ज्योतिष रत्न पुरस्काराने व कवी मोहन काळे यांना नक्षत्र काव्य दौलत पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनायक खोत, डॉ. हेमा चंद्रशेखर, रमेश खरमाळे, डॉ. मोहन गायकवाड, डॉ. अलका नाईक यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘उद्योजक गौरव स्मृती पुरस्कार’ सचिन कुलकर्णी, नितीन सावंत, राजेंद्र कोरे, योगेश बाहेती यांना देण्यात आला.
नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने घेण्यात आलेल्या २६ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेते दीप्ती कुलकर्णी (प्रथम क्रमांक) वैशाली क्षीरसागर (द्वितीय क्रमांक), अजित राऊळ सिंधुदुर्ग (तृतीय क्रमांक ) यांना यावेळी रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, गौरव चिन्ह, सन्मानपत्र, शाल, गुलाबपुष्प प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन रूपाली भालेराव यांनी केले. सुनील बिराजदार यांनी आभार मानले. संयोजनामध्ये बबन चव्हाण, प्रीती सोनवणे, विकास राऊत, ज्ञानेश्वर काजळे, जुई यादव, भाऊसाहेब आढाव, प्रा. काशिनाथ भुतुगे, संजय पोटे, मुजफ्फर इनामदार, संतोष देशमुख, नवनाथ पोकळे, दिव्या भोसले, बालाजी थोरात, गणेश लखणे, प्रकाश दळवी यांनी पुढाकार घेतला.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT