पिंपरी, ता. १७ ः भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती अर्थात अभियंता दिनानिमित्त महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होऊन अभियंत्यांनी विविध कलागुण सादर केले. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड इंजिनिअर्स असोशिएशन यांच्यातर्फे महापालिका मुख्यालय आणि क्षेत्राय कार्यालयांमध्ये कार्यक्रम झाले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत विश्वेश्वरय्या यांचे रांगोळीतून चित्र रेखाटले होते. किशोर गोखले (उपसंचालक, नगररचना व विकास विभाग), बापू गायकवाड (सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग), अण्णा बोदडे (उपायुक्त), किरण गायकवाड (विशेष अधिकारी) यांच्यासह पिंपरी-चिंचवड इंजिनिअर्स असोशिएशनचे सुनिल बेळगावकर (अध्यक्ष), चंद्रकांत कुंभार (कार्याध्यक्ष), संतोष कुदळे (सचिव) आदी उपस्थित होते. शहर अभियंता निकम म्हणाले, ‘‘शहरातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, अशा नवकल्पना राबविणारे अभियंते हे शहराच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांना सुरक्षित रस्ते, स्वच्छ पाणी, कार्यक्षम मलनिस्सारण व्यवस्था, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि टिकाऊ शहरी विकासाची हमी मिळते.’’
इंजिनिअर्स असोशिएशनतर्फे क्रिकेट, कॅरम, रायफल शुटींग, बुद्धीबळ, बॅटमिंटन, रांगोळी, पाककला व मेंहदी स्पर्धा घेण्यात आले. त्यात अभियंत्यानी उत्सफूर्त सहभाग घेऊन पारितोषिक पटकाविले. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यास प्रदीप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक्त), अविनाश पाटील (संचालक, नगररचना), अमित आंद्रे (मुख्य कार्यकारी अधिकारी, द डेटा टेक्ट लॅब), बलविंदर चंडोक (व्यवस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग), प्रमोद ओंभासे (मुख्य अभियंता), संजय कुलकर्णी (मुख्य अभियंता), मनोज लोणकर (सहआयुक्त) आदी उपस्थित होते.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.