पिंपरी-चिंचवड

‘शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार अधिक व्हावा’

CD

पिंपरी, ता. १७ ः ‘‘शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. हे कार्य सीएमएस विद्यार्थी आपल्या कलेतून करतील. केरळच्या बाहेर ओणमचा सण मोठ्या उत्साहात सर्व जाती धर्म एकत्रित येऊन साजरा करतात. केरळमध्ये उत्साह कमी झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, केरळबाहेर मळ्याळी बांधव जिद्दीने काम करीत आहे. आपली संस्कृतीचा प्रसार करीत आहे,’’ असे मत संगीतकार विद्याधरन यांनी व्यक्त केले.
निगडी येथील चिंचवड मळ्याळी समाजाच्या वतीने आकुर्डीच्या केरला भवन येथे ओणमचा उत्साहात साजरा करण्यात आला. मळ्याळी संगीतकार विद्याधरण मास्टर यांना राजहंस पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. रोख रक्कम ५० हजार स्मृतीचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अभिनेत्री अंबिका मोहन, सीएमएसचे अध्यक्ष टी. पी. विजयन, सुधीर नायर, पी. श्रीनिवासन, जॉय जोसेफ, .पी. व्ही. भास्करन, पी. सी. विजयकुमार, फॅन्सी विजयन, जी. करुणाकरन, व्ही. के. रामकृष्णन, प्रविजा विनीत आदी उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू निष्का नायर, ज्येष्ठ सदस्य रामकृष्ण पन्नीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संगीतकार विद्याधरन यांनी दिग्गज कलाकारांसोबतच्या रोचक घटना सांगितल्या. केरळमधील भूसख्खलन पूर्वीचे वायनाड- आताचे वायनाड यांचे चित्र नृत्यातून कलाकारांनी रसिकांसमोर सादर केले.
कार्यक्रमाचे समन्वयक व्ही. के. रामकृष्णन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन लता विनोद यांनी केले. पी. अजयकुमार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Bomb Blast : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षा वाढवली, दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट!

Gold Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले, चांदीही झाली महाग, तुमच्या शहरात आज काय आहे भाव? जाणून घ्या

'कुणी इतकं बेजबाबदार कसं असू शकतं?' हेमा मालिनी खोट्या बातम्या देणाऱ्यावर भडकल्या, म्हणाल्या...'अपमानकारक आणि गैरजबाबदार वर्तन'

Latest Marathi Breaking News : दिल्ली स्फोटानंतर शेगावच्या गजानन महाराज मंदिरात सुरक्षा वाढवली

Stock Market Opening : शेअर बाजार लाल रंगात उघडला; PhysicsWallah IPO आजपासून बाजारात; जाणून घ्या शेअर बाजारातील Updates

SCROLL FOR NEXT