पिंपरी-चिंचवड

प्रेयसीच्या मुलांकडून प्रियकरावर कोयत्याने हल्ला

CD

पिंपरी : प्रेयसीसोबतच्या प्रेमसंबंधावरून चिडलेल्या तिच्या मुलांनी प्रियकरावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना दापोडी येथील जयभीमनगर येथे घडली. या प्रकरणी दापोडीतील २९ वर्षीय तरुणाने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे अल्पवयीन मुलांच्या आईसोबत प्रेमसंबंध आहेत. त्या कारणावरून मुलांनी फिर्यादीवर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये फिर्यादीच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली.

दुचाकी घसरून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
पिंपरी : दुचाकी घसरून रस्ता दुभाजक आणि बसला पाठीमागून धडकली. या अपघातात गंभीर झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पीके चौकाजवळील भोसरीहून कोकणे चौकाकडे जाणाऱ्या बीआरटी मार्गिकेत घडला. मयूर आनंद रसाळ (वय २८, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपीएमएल बसचालक तानाजी किसन तेलंगे (रा. भोसरी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की
पिंपरी : विशेष ग्रामसभा सुरू असताना ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने नकार दिला. या कारणावरून एकाने ग्रामपंचायत अधिकाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात घडला. या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ महादेव भोंग (रा. आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कैलास केशव चोंधे (रा. चोंधे-दरा, भूगाव, ता. मुळशी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यात आरोपीने दक्षता समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला. त्यावर ग्रामपंचायत अधिकारी भोंग यांनी विशेष ग्रामसभेत असा ठराव मांडता येत नसल्याचे सांगितले. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

गांजा विक्रीप्रकरणी तरुणीला अटक
पिंपरी : गांजा विक्रीप्रकरणी एका तरुणीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात करण्यात आली. बालाजीनगर झोपडपट्टी येथे एक तरुणी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६४ हजार ९४० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तिच्याकडे असलेल्या गांजाबाबत चौकशी केली असता तिने तो गांजा तिच्या नणंदेकडून आणल्याचे सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT