पिंपरी, ता. १९ ः भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन. येत्या ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात ‘बिग बीं’ना संगीतमय सलामी देण्यासाठी ‘सुदेश भोसले लाइव्ह या विशेष कार्यक्रमाचे आयोजन काळेवाडीतील रागा लॉन्स येथे केले आहे. त्यामुळे बच्चन यांचा वाढदिवस यंदा आणखी खास ठरणार आहे.
अमिताभ यांनी गेली सहा दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दूरचित्रवाणी वाहिनीवरील सूत्रसंवादक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांच्या विविध चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आजही सर्व वयोगटांतील रसिकांच्या मनात घर करून आहेत. प्रत्येक जण ती गाणी गुणगुणत असतो. त्या गाण्यांना सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या आवाजाचा साज लाभणार आहे. त्यामुळे सुरेल स्वरांनी भारून टाकणारा हा कार्यक्रम पुणेकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.
कार्यक्रमाविषयी....
- सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्यासमवेत सहगायक मकरंद पाटणकर यांचा सहभाग
- बिग बी यांच्या शैलीत गाणारे व संवादफेक करणारे सुदेश भोसले यांचे असंख्य चाहते
- तिकिटांची सोय BookMyShow वर उपलब्ध
- चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ९.३० ते सायंकाळी ७ दरम्यान तिकीटविक्री
- ‘सकाळ’ने आयोजित कार्यक्रमाचे लोकमान्य महा-को-ऑप. सोसायटी लि. सहप्रायोजक
- अमिताभ बच्चन यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणींना उजाळा मिळणार
---
हे लक्षात ठेवा
काय? ः सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात बिग बींना वाढदिवसानिमित्त संगीतमय सलामी
कधी? ः शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५
केव्हा? ः सायंकाळी ६.३० वाजता
कुठे? ः रागा पॅलेस लॉन्स, काळेवाडी (एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील संत मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ)
----