पिंपरी-चिंचवड

मावळातील पाच शिक्षकांसह पुणे जिल्ह्यातील ६५ शिक्षकांचा सन्मान

CD

सोमाटणे, ता. २० ः मावळ तालुक्यातील पाच शिक्षकांसह पुणे जिल्ह्यातील एकूण ६५ शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या माध्यमिक शिक्षकांना दरवर्षी शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षिका संघ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीचा सोहळा नुकताच आळेफाटा येथे पार पडला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात व पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मावळ तालुक्यातून किसन पाटील (आदर्श विद्यामंदिर, तळेगाव), वर्षा बारबोले (संत ज्ञानेश्वर विद्यानिकेतन, जवण), स्वप्निल नागणे (नाने माध्यमिक विद्यालय, नाने), दत्तात्रेय जोशी (रामभाऊ परुळेकर विद्यालय, तळेगाव) व ज्ञानेश्वर अरनाळे (माध्यमिक विद्यालय, सांगिसे) या पाच शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षा स्नेहल बाळसरफ, मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बालम शेख व शिक्षक लोकशाही आघाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष राधाकृष्ण येणारे यांनी केले.

PNE25V51466
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: धार्मिक सलोखा राखण्यास आणि गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार; महायुती सरकारकडून नव्या योजनेसाठी २ कोटींची मंजुरी

Latest Marathi News Live Update : परभणीमध्ये कौटुंबिक न्यायालयाला आग लागली

Nashik News : 'मोफत' वाळूची वाहतूक न परवडणारी; घरकुल लाभार्थी संतापले

Kumar Ambuj : हिंदी कवी कुमार अंबुज यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या जागेचा प्रश्न पुन्हा अधांतरी; मंत्री महाजनांच्या आश्वासनाचे काय?

SCROLL FOR NEXT