पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा
तळवडेकडून चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिंद्रा कंपनीसमोरच्या जवळपास एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी आणि कंपनीच्या बससह अवजड ट्रक आणि ट्रेलर्सची वाहतूक सतत सुरू असते. पण, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
- शिवराम वैद्य, निगडी
PNE25V51529

शिंदे वस्ती रस्त्यावर चिखल
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पदपथ, रस्ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. चिंचवडगाव ते इस्कॉन रावेत, शिंदे वस्ती परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर डबकी तयार होतात. इमारतीमध्ये काम करत असताना चिखल, गाळ रस्त्यावर येणे धोकादायक आहे. महिला - युवती, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित चालणार कसे ? गेले कित्येक महिने हा प्रकार चालू आहे.
- विजय निकाळजे, चिंचवडगाव
PNE25V51527

थेरगावात पदपथ बांधा
थेरगावात डीपी रस्त्यावर उजव्याबाजूला पदपथच नाही. थेरगावात दत्तनगर राघवेंद्र मठापसून ते पवारनगर रस्त्यावर फक्त डाव्या बाजूलाच पदपथ आहे. उजव्या बाजूला नाल्यापर्यंत कुठेही पदपथ नाही. दुकानासमोर सामान ठेवलेली वाहने हातगाड्या उभ्या केलेल्या असतात. पादचाऱ्यांना खूपच अडचणीचे व त्रासदायक ठरते. महापालिकेने पदपथ बांधून नागरिकांची त्रासातून सुटका करावी.
- रमेश पाटील, थेरगाव
PNE25V51528

चेंबरला दर्जेदार झाकणे बसवा
थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल समोर संभाजी चौक आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी चेंबरची बातमी ‘सकाळ टुडे’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. २५ ऑगस्ट २०२५ रोजी चेंबरचे झाकण दुरुस्त केले. त्यानंतर १७ सप्टेंबरला म्हणजे २३ दिवसानंतर परत चेंबरची ही अवस्था झाली आहे. या चौकात खूप रहदारी असल्याने येथे चेंबरला जास्तीत जास्त दर्जेदार झाकण बसविले पाहिजे.
- राजेश डावरे, संभाजी चौक
PNE25V51526

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: 'वीरशैव अन्‌ लिंगायत एकच; नवीन धर्माला नाही पाठिंबा'; हुबळीतील संमेलनात चार जगद्‌गुरू..

Suji Chila Vs Besan Chilla Vs Wheat Roti: रवा चिला, बेसण चिला कि चपाती? वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर?

Air Pollution: वायू प्रदूषणाच्या संकटावर मात! पनवेल पालिकेची १० ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा

U19 IND vs U19 AUS: भारताने फक्त ३१ ओव्हरमध्ये पार केलं ऑस्ट्रेलियाचं मोठं लक्ष्य; पहिल्या वनडेत दणदणीत विजय

PM Modi: आधी व्यापाऱ्यांच्या वेदनेचा संघर्ष सांगितला; नंतर नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाला कोणता नवा मंत्र दिला?

SCROLL FOR NEXT