पिंपरी-चिंचवड

- नागरि समस्यांचे अधिकार्‍यांना धडाडीने आदेश देवून तत्काळ निवारण

CD

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्योगनगरीत पुनरागमन
समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धडाडीने आदेश देत निवारण,
जनसंवादला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

किंवा
उपमुख्यमंत्र्यांची साद, उत्स्फूर्त जनसंवाद
उद्योगनगरीला भेट, नागरी समस्यांवर अधिकाऱ्यांना आदेश थेट

पिंपरी, ता. २० : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना वाचा फोडण्यासाठी आणि तातडीने निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवारी (ता. २०) पुनरागमन झाले. काळेवाडीतील जनसंवाद कार्यक्रमात त्यांच्‍या पद्धतीने अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रागा पॅलेस येथे हा उपक्रम पार पडला. सकाळी साडे नऊ ते दोन या वेळेत पवार यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्‍या समस्‍या जाणून संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिकेचे आयुक्‍त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्‍त डॉ. योगेश म्‍हसे, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, समाजकल्‍याण विभागाच्‍या आयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे, पिंपरी चिंचवडचे अप्‍पर तहसीलदार जयराज देशमुख आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधीपक्ष नेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्‍हाणे, शाम लांडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित होते.
---
उपमुख्यमंत्री म्‍हणाले
- अशुद्ध पाणी, सोसायटीधारकांसाठी रस्‍ते, कचऱ्याची विल्‍हेवाट, रेडझोन बाबतच्या प्रश्नांचे तत्‍काळ निराकरण
- नागरिकांच्या समस्या नगरविकास, सामाजिक, कामगार, पोलिस या विभागांशी संबंधित
- सर्व निवेदनांची नोंद घेतली असून माझ्या कार्यालयातून पुढील कार्यवाही होणार
- नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व अधिकारी, सरकार कटिबद्ध
---
क्षणचित्रे -
- पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, रेडझोनसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांकडून निर्भीड मांडणी
- विविध शासकीय विभागाचे २५ कक्ष
- अपंग बांधव, वयोवृद्धांसह महिलांच्‍या तक्रारींची दखल
- पाणी, कचऱ्याबाबत जास्त निवेदने
- संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून जागेवरच उपाययोजना
- पिंपरी चिंचवडशिवाय बुलडाणा, जळगावच्‍या नागरिकांनी मांडल्‍या व्‍यथा
- समस्येचे तत्काळ निवारण होत असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान
---

महिलांना त्रास देणाऱ्या गुंडगिरीचा बीमोड करा
अजित पवार यांनी सांगितले की, सुरक्षिततेच्या दृष्टीने रहाटणी येथील विझडमपार्क सोसायटीतील महिलांनी निवेदन दिले. त्याबाबत पोलिस आयुक्‍त विनयकुमार चौबे यांना सूचना दिल्‍या. मुख्यमंत्री, आम्ही आणि सरकार महिलांच्‍या सुरक्षेबाबत आग्रही आहोत. लाडक्‍या बहिणींना मान सन्‍मान मिळाला पाहिजे. त्‍यांची कोणत्‍याही कामात फसवणूक, अडवणूक होता कामा नये. सुरक्षेबाबत कोणाचीही गुंडगिरी, दहशत चालता कामा नये. कोणीही राजकीय यात हस्‍तक्षेप करणार नाही. सर्वसामान्‍य नागरिकांवर अन्‍याय होत असेल तर; सत्‍ताधारी असो व विरोधी किंवा गुंडगिरी करणारे....त्यांचा बीमोड करायचा, अशा सूचना पोलिस प्रशासनाला दिल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT