पिंपरी-चिंचवड

‘दिक्षारंभ’मधून विद्यार्थ्यांचे स्वागत

CD

(डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ)
आकुर्डीतील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठात ‘दिक्षारंभ’ विद्यार्थी स्वागत सोहळा झाला. प्रेरणादायी संदेश, पुस्तक प्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. ‘मेहफिल क्लब’च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कॅप जेमिनी इंजिनिअरिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेटे, फ्लोकार्डचे मुख्य डिजिटल संचालक सुशील तिवारी, संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनिष भल्ला, कुलसचिव डॉ. बेरान मनोद्दीन, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. शशी सिंह, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. माधवी देशपांडे, परीक्षा नियंत्रक डॉ. मधुरा जगताप उपस्थित होते. कॅम्पस संचालक रिअर ॲडमिरल (निवृत्त) अमित विक्रम यांनी मार्गदर्शन केले. ‘दि नाऊ अँड द नेक्स्ट : इंटरडिसिप्लिनरी रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.

‘यशोप्रवेश’ कार्यक्रम उत्साहात
(आयआयएमएस आणि आयबीएमआर)
चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयबीएमआर) यांच्या एमबीए व एमसीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा ‘यशोप्रवेश’ कार्यक्रम झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, बायोरॅड मेडीसीस कंपनीचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी डॉ. उज्ज्वल भट्टाचार्जी उपस्थित होते. यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मीनल राव (वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका, थरमॅक्स कंपनी), मनोजकुमार चौधरी (सॅप डिलिव्हरी मॅनेजर व आयबीएम प्रशिक्षक), डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा (अध्यक्ष, सायबर सिक्युरिटी कोऑपरेशन), ॲड. सीमा शर्मा, प्राची सोनचल (प्रमुख मनुष्यबळ व्यवस्थापिका, बर्कहार्ट कॉम्प्रेशन होल्डिंग), अनुपमा मिश्रा, आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, तृप्ती पाटील, आयबीएमआरचे संचालक डॉ. बाळासाहेब शिवळे आदींनी मार्गदर्शन केले. नताशा दलाल, कोमल गौड, रिया मिरजकर, सेजल गायकवाड या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. डॉ. वंदना मोहंती यांनी आभार मानले.

अविष्कार पूर्वतयारी कार्यशाळा
(प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय)
आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात अविष्कार पूर्वतयारी मार्गदर्शन कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता कक्ष संचालक व गणित विभागप्रमुख प्रा. डॉ. विनायक जोशी यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य हिरालाल सोनवणे, मधुकर राठोड, संशोधन समन्वयक प्रा. सुचित्रा परदेशी उपस्थित होते. अविष्कार स्पर्धा ही पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन (पीएचडी) अशा तीन स्तरावर ‘मानव्य भाषा व कला’, ‘वाणिज्य व्यवस्थापन व कायदा’, ‘विज्ञान’, ‘कृषी व प्राणिशास्त्र, ‘अभियांत्रिकी व तंत्रज्ञान’, ‘औषध निर्माण’ अशा सहा गटांत घेतली जाते, असे त्यांनी नमूद केले. अमोल बिबे यांनी आभार मानले. प्रा. शिल्पागौरी गणपुले, प्रा. रश्मी मोरे, प्रा. अर्जुन डोके, रणजीत चव्हाण व सचिन इंदुरे यांनी संयोजन केले.

‘सृजनरंग’ला प्रतिसाद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) यांच्यातर्फे सृजनरंग सांस्कृतिक व साहित्यिक जिल्हास्तरीय (पुणे ग्रामीण) स्पर्धा झाली. प्राचार्य प्रा. डॉ. अभय खंडागळे, अभिजित कुलकर्णी (संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), उपप्राचार्य एच. बी. सोनवणे, मधुकर राठोड, कार्यालयीन अधीक्षक संजय झेंडे, स्वाती काळे (राष्ट्रीय सेवा योजना विभाग समन्वयक) उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सारिका मोहोळ (राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक) यांनी केले. निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, पथनाट्य, पोवाडागायन, भित्तिचित्रे आदी स्पर्धांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. महादू बागुल, डॉ. सारिका मोहोळ, डॉ. पूनम वाणी व डॉ. वैभव साळवे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमोल बिबे यांनी केले. आभार डॉ. वैभव साळवे यांनी मानले.

ऑटो क्लस्टरतर्फे कस्टमर कॉन्क्लेव्ह

(ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट)
ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित कस्टमर कॉन्क्लेव्ह उत्साहात झाला. ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील ८० प्रतिनिधी सहभागी झाले. मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य यांनी स्वागत केले. एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी फार्मास्युटिकल, ईव्ही आणि डिफेन्स क्षेत्रातील संधींबद्दल भाष्य केले. डॉ. ए. के. जिंदल (ग्रुप ॲडव्हायझर, टाटा ऑटो कॉम्प आणि ऑटो क्लस्टर बोर्ड सदस्य) यांनी इलेक्ट्रिक वाहने, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी क्षेत्र आणि प्रोटोटायपिंगमधील वाढीची संधी मांडली. ऑटो क्लस्टरचे सीओओ प्रसाद गोरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाण यांनी ‘पे ॲज यू गो’ या सेवा पद्धतीबद्दल माहिती दिली. ऑटो क्लस्टरच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागातील शांतनू मुदखेडकर यांनी आभार मानले.

महिला सशक्तीकरण आणि ‘आविष्कार’
(रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल)
रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयात महिला सशक्तीकरण कार्यशाळा व आविष्कार स्पर्धा झाली. नांदी फाउंडेशनच्या सहकार्य लाभले. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा उद्देश होता. नांदी फाउंडेशनच्या प्रियंका शर्मा व आसावरी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. संजय वालोदे, प्रा. डॉ. श्वेता घोडे, प्रा. चेताली महाजन व प्रा. पूनम ब्राह्मणे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी या हेतूने आविष्कार संशोधन स्पर्धा झाली. त्यात १० गटांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे मूल्यमापन एमएम कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. डॉ. मनोज अस्वार यांनी केले. म्यूकोअ‍ॅडेसिव्ह हर्बल पॅच, पॉलिहर्बल हायड्रोजेल, पॉलिहर्बल पिकली उष्णता पावडर, संज्ञानात्मक कल्याणासाठी जेलिफिश, सूक्ष्म ध्यान मेगा एकाग्रता, पेंडलूप- एक पर्यावरणपूरक तंत्रज्ञान अशा विविध प्रकल्पांचा समावेश होता. संशोधन समन्वयक डॉ. प्रियांका चौधरी यांनी संयोजन केले. डॉ. समीर लकडे, डॉ. श्वेता घोडे, डॉ. मनीषा खेरे, प्रा. सायली देठ, प्रा. सेहल पाटील, प्रा. स्वाती टाकणे, प्रा. सेहल तुसे, प्रा. किशोरी होळे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांचे स्टार्टअपमध्ये यश
(वाय. बी. पाटील पॉलिटेक्निक)
आकुर्डीतील वाय. बी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी पहिले स्टार्टअप सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख नंदकुमार स्वामी आणि प्राचार्य डॉ. अरविंद कोंडेकर यांच्या हस्ते सत्कार केला. ऋषिकेश स्वामी आणि ऋषिका शर्मा या विद्यार्थ्यांनी आरएस स्टुडिओ अँड सर्व्हिसेस या नावाने स्टार्टअपची नोंदणी केली आहे. प्राचार्य डॉ. कोंडेकर यांनी नवोन्मेष सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना उद्योजकता केंद्र समन्वयक राहुल बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.

आयईटीई व टेसा क्लब स्थापन
(डॉ. डी. वाय. पाटील टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट)
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात दि इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स (आयईटीई) आणि टेलिकॉम इंजिनियरिंग स्टुडन्ट असोसिएशन (टेसा) क्लबची स्थापना झाली. विभाग प्रमुख डॉ. डी. जी. भालके, डॉ. गायत्री लोंढे, डॉ. प्रमोदकुमार कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. भालके यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, कार्यक्रम व्यवस्थापन व तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याबाबत आणि डॉ. कुलकर्णी यांनी आयईटीई फोरमच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. क्लब अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, क्रिएटिव्ह प्रमुख, खजिनदार, इव्हेंट मॅनेजमेंट हेड व टेक्निकल हेड अशा पदांवर विद्यार्थ्यांची निवड केली. डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, उपकुलगुरू डॉ. धीरज अग्रवाल, प्राचार्य डॉ. नितीन शेरजे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: अरे कॅच घेतला रे! संजू सॅमसनने जमिनीलगत झेलला चेंडू, पाकिस्तानी फलंदाजही झाला शॉक; पाहा Video

हुंड्यासाठी विवाहितांचा वाढतोय कौटुंबिक छळ! ‘माहेरहून पैसे आण नाहीतर मूल होऊ देणार नाही’, सासरच्यांची विवाहितेला धमकी; पैशासाठी मेव्हण्याचे तुकडे करण्याची पतीची धमकी

Nashik Accident:'वाहन पलटी हाेऊन १ ठार तर ११ गंभीर जखमी'; सप्तशृगी वणी गडावर ज्याेत नेण्यासाठी जाताना घडली घटना, नेमकं काय घडलं..

Teacher Transfer Emotional : मॅडम, तुम्ही जाऊ नका! विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा; बीबीदारफळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेसाठी चिमुकले भावूक

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT