पिंपरी-चिंचवड

शक्तिपीठ दर्शनासाठी एसटीतर्फे बससेवा

CD

पिंपरी, ता. २२ : नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडून साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी विशेष बस धावणार आहेत. या सुविधेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन बससाठी नोंदणी पूर्ण झाली आहे. प्रवासी वाढल्यास विशेष बस सोडण्यात येणार आहेत.

याबाबत वल्लभनगर स्थानक प्रमुख वैशाली कांबळे यांनी माहिती दिली. कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्तशृंगी या साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने जातात. या निमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील भाविकांसाठीही एसटीतर्फे विशेष बस सोडण्यात येत आहेत. महामंडळाच्या संकेतस्थळावर त्याचे आरक्षणही सुरू आहे. वल्लभरनगर आगारातून २७ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता बस साडेतीन शक्तिपीठांसाठी रवाना होईल. या प्रवासासाठी तीन हजार १०१ रुपये भाडे निश्चित आहे. तुळजापूर, माहुर आणि सप्तशृंगी गड येथे मुक्काम असणार आहे. तेथे राहणे, जेवण आणि इतर खर्च स्वतः प्रवाशांना स्वत: करावा लागणार आहे. वरील शहरांसाठी एक किंवा सर्व ठिकाणी जाण्यासाठी ग्रुप बुकिंगही उपलब्ध आहे.

सवलतीचा लाभ घेता येणार
राज्य शासनाने ‘महिला सन्मान’ योजनेअंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. तर ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत आहे. या दोन्ही योजनांच्या सवलतीचा लाभ साडेतीन शक्तिपीठ दर्शन विशेष बस सेवेसाठी घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Shopping Tips : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सिझन शॉपिंग करत आहात? 'या' ५ चुका पडतील महागात

Latest Marathi News live Updates : आवडत्या शिक्षकाची बदली, विद्यार्थी, गावकऱ्यांना अश्रू अनावर

GST on Insurance Premium: विमा पॉलिसींवर जीएसटी शून्य; लाखो ग्राहकांना दिलासा, पण 'या' पॉलिसीधारकांना फायदा मिळणार नाही कारण...

IND vs PAK: रडके! सूर्या झाला, अँडी पायक्रॉफ्ट झाले, आता थर्ड अम्पायर; पाकिस्तानने केली ICC कडे तक्रार

Navratri Festival : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके... च्या मंत्रोच्चारात वणीगडावर सप्तशृंगी मातेच्या नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ...

SCROLL FOR NEXT