पिंपरी-चिंचवड

नवरात्रोत्सवामुळे शहरात चैतन्य

CD

पिंपरी, ता. २२ ः शारदीय नवरात्राला पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात सुरवात झाली. नवरात्रोत्सवानिमित्त शहरात चैतन्य निर्माण झाले आहे. सोमवारी पहाटेपासूनच देवीच्या मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. घरोघरी महिलांनी घटस्थापना केली.
भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावल्यामुळे मंदिरे गजबजून गेली होती. घरोघरी घटस्थापना केल्यानंतर मंदिरात जाण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. सायंकाळी सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत मिरवणूक काढून देवीची स्थापना केली.

घरोघरी घटस्थापना

नऊ दिवस चालणाऱ्या आदिशक्तीच्या उत्सवासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महिलांची जय्यत तयारी सुरू होती. सोमवारीही पहाटेपासूनच घटस्थापनेची तयारी सुरू करण्यात आली. सकाळी पूजासाहित्यासाठी बाजारपेठेत, तर फुले, हार, पाने घेण्यासाठी फूलबाजारात गर्दी झाली होती. घरोघरी नागरिकांनी घटस्थापना करून नंदादीप लावले आणि देवीची मनोभावे पूजा केली.

मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव

शहरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच अभिषेक पूजा सुरू झाली. बहुतांश मंदिरांमध्ये नऊ दिवस देवीची विविध रुपांमध्ये पूजा बांधली जाते. सोमवारीही पांढऱ्या रंगाची वस्त्रे देवीला परिधान करण्यात आली. पहाटेपासूनच शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आई राजा उदे उदे... अंबाबाईचा उदे उदे... अशा जयघोषात भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. आकुर्डीतील तुळजाभवानी, निगडीतील दुर्गादेवी, पिंपरीतील वैष्णोदेवी, चिंचवडमधील कालिकामाता, दापोडीतील फिरंगाई, वडमुखवाडी व आळंदीतील पद्मावती, डुडुळगावातील येळाईमाता, पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी या मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. नवरात्रोत्सवामुळे मंदिर परिसरात यात्रेसारखे वातावरण निर्माण झाले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: आनंदाची बातमी! मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर १० अतिरिक्त ट्रेन चालवणार, २ नवीन स्थानके सुरू होणार

Viral Video: प्राजक्ता माळीचे योगासने पाहिले का? सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Astrology Prediction : कितीही प्रयत्न करा 'या' राशीच्या लोकांचं लग्न टिकत नाही! आयुष्यभर राहतो तणाव..पाहा 'या' जोड्या कोणत्या?

Latest Marathi Breaking News Live: बच्चू कडूच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक

Pakistan Military: पाकमध्येही आता सरसेनाप्रमुखपद; सरकारकडून घटनादुरुस्तीसाठी विधेयक

SCROLL FOR NEXT