पर्यावरणप्रेमी, पक्षीमित्र, ट्रेकर्स, खेळाडू अशा सर्वांचे शहरातील आवडते ठिकाण म्हणजे निगडीतील दुर्गादेवी टेकडी उद्यान. या टेकडीवरील झाडे, तेथील शांतता, जॉगिंग ट्रॅक व ओपन जिममुळे तंदुरुस्ती, व्यायामाची आवड असलेल्यांची नेहमीच गर्दी असते. या टेकडीवर दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्यामुळे दुर्गा टेकडी म्हणूनच हे ठिकाण ओळखले जाते. टेकडीच्या पायथ्याला खोदकाम करत असताना खाणकामरागांना दुर्गादेवीची शिळा सापडली. १९७२ मध्ये या देवीची स्थापना टेकडीवरील गुहेत करण्यात आली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गुहेच्याबाहेर सभामंडप उभारण्यात आला. मंदिराच्या आजूबाजूला सुशोभीकरण करण्यात आले. अतिशय निसर्गरम्य वातावरणात असणारा दुर्गा देवी मंदिराचा परिसर आलेल्या भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच आत्मिक समाधानही देतो.
महापालिकेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून येथे नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. एरवी टेकडीवर येणाऱ्या नागरिकांना प्रवेश शुल्क आकारले जाते. नवरात्रात ते माफ केले जाते. टेकडीचा परिसर ७५ हेक्टर क्षेत्रावर पसरलेला आहे. मंदिराच्या बाजूला जंगल व गर्द झाडी आहे. नवरात्रात रात्री आठपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नवरात्रात काळात पहाटेपासूनच भाविकांची विशेषतः महिलांची गर्दी पाहायला मिळते.
मंदिराला आकर्षक सजावट व रोषणाई केली जाते. नऊ दिवस देवीची विविध रुपांमध्ये पूजा केली जाते. पहाटेची आरती येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केली जाते. दिवसभर विविध महिला भजनी मंडळे येथे भजन सेवा करतात. श्रीसुक्त पठण व इतरही धार्मिक विधीही पार पडतात.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.