पिंपरी-चिंचवड

‘पॅट’ परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

CD

पिंपरी, ता. २३ : संकलित मूल्यमापन, नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात ‘पॅट’ परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे नियोजन आहे. मात्र, ‘एससीईआरटी’ अर्थात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे ‘पॅट’चे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे मुख्‍याध्यापकांचे लक्ष लागले आहे.

शहरात सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीसाठी वार्षिक परीक्षेसह संकलित मूल्यमापन, ‘पॅट’ चाचणीसाठी एकच वेळापत्रक असते. तर, शाळांना दहा, ११ ऑक्टोबर आणि १३ ऑक्टोबर रोजी प्रथम परीक्षा घेण्याचे स्पष्ट केले आहे. पण, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही, असे मुख्याध्यापक सांगत आहेत. त्यामुळे प्रश्‍नपत्रिकांचा पुरवठा कसा होणार? यापूर्वीच्या सत्रात शहरातील अनेक शाळांना प्रश्‍नपत्रिका पुरेशा प्रमाणात मिळाल्या नव्हत्या. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, सोशल मीडियाद्वारे मागणी नोंदवली होती. त्यावेळी प्रश्नपत्रिका पुरविणे, नियोजन करण्याचे काम प्रशासकीय पातळीवरुन उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे आगामी परीक्षांचे वेळापत्रक वेळेत जाहीर केल्यावर हा घोळ मिटेल, असे मुख्याध्यापक सांगत आहेत.

संकलित मूल्यमापन परीक्षा (पॅट) आणि प्रथम सत्र परीक्षा वेळापत्रक लवकर मिळाले, तर सर्व शाळांसाठी बरे होईल. कारण शाळेतील वेळापत्रकही मुलांना द्यायचे आहे. मुलांना वेळापत्रक लवकर मिळण्यासाठी ‘पॅट’चे नियोजन जाहीर करावे.
- नीलेश गायकवाड, जिजामाता माध्यमिक विद्यालय, भोसरी

प्रथम सत्र परीक्षेमध्येच ‘पॅट’चे नियोजन असावे. यासाठी वीस दिवस बाकी आहेत. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक घोषित होणे गरजेचे आहे. प्रशासनाने प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या उपलब्ध करावी. ती योग्य की, अयोग्य याबाबत संबंधित मुख्याध्यापकाने योग्य त्या पुराव्यासह दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मागील परीक्षेवेळी ही आकडेवारी मिळावी, अशी विनंती केली होती. त्याबाबत अद्यापही कृती झालेली नाही. किमान आपल्या जिल्ह्याची माहिती प्रसिद्ध होणे गरजेचे आहे.
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

Poisioning : झारगडवाडीत भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याचा संशय; ४ महिलांवर उपचार सुरू

Mohol News : नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, बाधित झालेल्या सर्व घटकांच्या नोंदी घ्या; योगेश कदम यांनी दिल्या सूचना

Dickie Bird: क्रिकेटविश्वात शोककळा ! भारताच्या १९८३ वर्ल्ड कप विजयाचे साक्षीदार राहिलेल्या दिग्गजाचे निधन

SCROLL FOR NEXT