पिंपरी-चिंचवड

संताजी सेवा प्रतिष्ठानकडून विविध पुरस्कारांचे वितरण

CD

पिंपरी, ता.२५ ः संताजी सेवा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि संताजी सेवा तेली समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात वरील कार्यक्रम झाला.
यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, बार्टीच्या कार्यालयीन अधीक्षक प्रज्ञा मोहिते, महेश गवई, उद्योजक विष्णुपंत डेंगाळे, वैशाली आतकर, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सरोज अंबिके उपस्थित होते.
प्रज्ञा मोहिते यांनी शासकीय योजनांबद्दल माहिती दिली. उपक्रम प्रमुख सुधाकर लोखंडे यांनी संस्थेच्यावतीने आयोजित वधूवर मेळाव्याबद्दल माहिती दिली. संताजी सेवा प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त समाज बांधव रेखा डिंगोरकर, रामभाऊ पिसे, नितीन जगनाडे, गोविंद चौधरी, गजानन सायकर यांना सामाजिक कार्यासाठी; तर राजश्री चिलेकर, नितीन राऊत (उद्योजक), विश्वासराव डोंगरे (आध्यात्मिक) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ७० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रदीप सायकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गणेश अंबिके, राजाराम वंजारी, मनोज आणेकर, सुनील देशमाने, अमोल देशमाने, सचिव जिजा राजाराम वंजारी, खजिनदार रोहिदास पडगळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyananda : वॉर्डन मुलींना जबरदस्तीने बाबाच्या खोलीत न्यायच्या अन्... स्वामी चैतन्यानंदचे काळे कारनामे उघड होताच खळबळ

Agriculture News : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते! खेडलेझुंगेमध्ये सोयाबीन, मका पिके पाण्याखाली

लेफ्टनंट कर्नल Prasad Purohit यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर निर्णय

Nashik Leopard Attack : १२ तासांच्या शोधमोहिमेनंतर चिमुकल्याचा मृतदेह आढळला; बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांत संताप

बिहारमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात केंद्राकडून १० हजार; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय? ठाकरेंकडून पीएम केअर फंडाची मागणी

SCROLL FOR NEXT