पिंपरी-चिंचवड

संवाद सकाळ

CD

पदपथावरील साहित्य हटवा
चिंचवड येथील एल्पो चौक, यशस्वी भवनालगत पदपथावर अनेक वर्षांपासून पेव्हिंग ब्लॉक, सिमेंटचे दुभाजक, टाकाऊ साहित्य, भंगार साहित्य अनेक वर्षांपासून पडून आहेत. त्याने वाहतुकीस अडथळा होत आहेत. पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. अतिशय रहदारी असलेला रस्त्यावर नाईलाजास्तव चालावे लागते. अपघात होत आहेत. वारंवार महानगरपालिकेत कळवून सुद्धा महानगरपालिकेतून उपाय योजना करण्यात येत नाहीत. तरी पदपथावरील बांधकाम साहित्य हटवून रस्ता स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीस उपलब्ध करून देण्यात यावा.
- दिलीप बाफना, चिंचवड
PNE25V53685

बिजलीनगर पुलावर पोलिस नेमा
आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बिजलीनगर येथील पुलावरुन सर्रास वाहनचालक भरधाव वेगाने आपला जीव धोक्यात घालून चुकीच्या दिशेने वाहतूक करत असतात. त्यामुळे बऱ्याचदा अपघात व वाहतूक कोंडी होते. परंतु, नागरिक मात्र कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता वाहतूक करतात. कृपया, या ठिकाणी वाहतूक पोलिस बंदोबस्त तैनात करावा.
- रोहन वाल्हेकर, वाल्हेकरवाडी, चिंचवड
PNE25V53674

कासारवाडीतील व्हॉल्वमधून गळती
कासारवाडी येथील रस्त्याजवळ व्हॉल्वमधून गळती होऊन रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून मी पाहत आहे. पाणीपुरवठा गळती त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. युनियन बँक कलासागरजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. या गळतीमुळे या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
- नारु पोकर, कासारवाडी
PNE25V53671

गटाराचे झाकण खचले
पिंपळे गुरव येथील रविराज हॉटेल, पिंपळे गुरव - दापोडी रस्त्याशेजारील पदपथावरील गटाराचे झाकण खचले आहे. त्यामुळे, तेथे अपघात होऊ शकतो. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी.
- नितीन नवले, पिंपळे गुरव
E25V53670


एसटी आगारात घाण
वल्लभनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारात घाण पसरली आहे. प्रवाशांनी झाडाच्या संरक्षण जाळीत पाण्याच्या, मद्याच्या बाटल्या व इतर तत्सम खाद्य पदार्थाचे कागदी व प्लॅस्टिक आवरणे जाळीत टाकली आहे. इतरत्र थुंकून घाण केली आहे. या घाणीमुळे डेंगी, हिवताप, स्वाईन फ्ल्यू आदी संसर्ग पसरविणारे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शहरात १७ ते २ ऑक्टोबर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे, याची साधी पुसटशीही कल्पना आगार प्रमुखांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहिती नसावी यांचे आश्चर्य वाटते.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V53712

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

Suryakumar Yadav वर ICC ची कारवाई! पाकिस्तानने केलेल्या तक्रारीवर झाली सुनावणी; 'ते' विधान पडलं महागात

SCROLL FOR NEXT