पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

वकीलाची पावणेदोन कोटींची फसवणूक

पिंपरी : स्वतःला सीबीआय अधिकारी भासवून आणि बनावट आधारकार्डचा गैरवापर करत आरोपींनी एका वकीलाला मनी लॉन्ड्रींगच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती घालत १ कोटी ८० लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणी पिंपरीतील उद्यमनगर येथील ७३ वर्षीय वकीलाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पीडीएफ पाठवून विश्वास संपादन केला. खात्यावरील रक्कम व्हेरिफाय झाल्यानंतर परत करण्याचा विश्वास देऊन फिर्यादीकडून जबरदस्तीने एकूण १ कोटी ८० लाख ३७ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडले.

जादा परताव्याच्या आमिषाने १६ लाखांना गंडा

पिंपरी : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाची १६ लाख ३६ हजार ९६५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी पोत्तम रबी नारायण पात्रो (रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोही पटेल नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोही पटेल नावाच्या व्यक्तीने फिर्यादीला स्टॉक मार्केटिंगची माहिती देऊन गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या अकाऊंट नंबरवर एकूण १६ लाख ३६ हजार ९६५ रुपये गुंतवण्यास भाग पाडले. आयपीओमधील ३८ लाख १० हजार ८४६ रुपये रक्कम परत भरावी लागेल, असे सांगून आणखी पैशांची मागणी केली.

नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूक
पिंपरी : कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ४ लाख १० हजार ४१० रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली. या प्रकरणी ग्रीष्मा आशुतोष मेहता (रा. मोशी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉलेज इंडिया ओपीसी प्रा. लि. कंपनीतील सूरज आणि राहुल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. डॉलेज कंपनी, दिल्ली येथील आरोपींनी फिर्यादीला सिसको कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी ऑनलाईनद्वारे त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यावर एकूण ४ लाख १० हजार ४१० रुपये ऑनलाईन घेतले.


गुंतवणुकीच्या नावाखाली ३३ लाखांची फसवणूक
पिंपरी : ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली ३३ लाख २५ हजार रुपये घेऊन कोणताही परतावा न देता फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली. या प्रकरणी सुरेश गणतपराव बासुतकर (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात आरोपीने फिर्यादीकडून ऑनलाईन ३३ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन गुंतवणूक म्हणून घेतले. मात्र, त्या रकमेवर कोणताही परतावा दिला नाही किंवा
कोणताही प्रतिसाद दिला नाही.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळील भोसरी मेट्रो स्थानकाजवळ घडली. सरदार महिबुब वालीकर (वय ४९) असे मृत दुचाकीचालकाचे नाव आहे. या प्रकरणी रामदेव लालबहादुर गौड (वय ४३, रा. साकीनाका, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वालीकर हे मेट्रो स्थानकाजवळील रस्त्याने दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने वालीकर यांचा मृत्यू झाला.


मारहाण प्रकरणी बारा जणांवर गुन्हा
पिंपरी : किरकोळ कारणावरून पाच जणांना मारहाण केल्याप्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिंचवड येथे
घडली. या प्रकरणी दत्तात्रेय गंगाराम चिंचवडे (रा. गणेशपेठ मोरया गोसावी मंदिर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिनकर रामचंद्र चिंचवडे (वय ४५), मयूर राजेंद्र चिंचवडे (वय ३५), सागर राजेंद्र चिंचवडे (वय ३३), सुनील रामचंद्र चिंचवडे (वय ५५), शुभम सुनील चिंचवडे (वय २४), आदित्य दिनकर चिंचवडे (वय २०), नितीन रामचंद्र चिंचवडे (वय ४२), भूषण विजय चिंचवडे (वय ४५), मंतन नितीन चिंचवडे (वय २१), भारत विजय चिंचवडे (वय ४०), अजय माऊली चिंचवडे (वय ४८), संकेत चिंचवडे (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

Suryakumar Yadav वर ICC ची कारवाई! पाकिस्तानने केलेल्या तक्रारीवर झाली सुनावणी; 'ते' विधान पडलं महागात

SCROLL FOR NEXT