पिंपरी-चिंचवड

नातेवाईकांचे दागिने, रोकड चोरणाऱ्या तरुणीला अटक

CD

तळेगाव स्टेशन, ता. २५ : नातेवाईक महिलेला हॉटेलमध्ये बसवून तिच्या घरातून पावणेआठ लाखांचे दागिने आणि १८ हजारांची रोकड तरुणीने लंपास केली. ही घटना १८ सप्टेंबरला घडली. या प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तरुणी आणि तिच्या साथीदाराला जेरबंद केले आहे.
याबाबत वराळे येथील एका महिलेने फिर्याद दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांनी पथक नेमत सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर संशयित तरुणीला तळेगाव स्टेशन परिसरात ताब्यात घेतले. अधिक चौकशीत तिने घरफोडीची कबुली दिली. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सलमान विक्रोमद्दीन शेख (२३, व्हिजन सिटी,जांभुळ ,ता. मावळ) यालाही अटक केली आहे. तिने चोरीतील काही दागिने एका संस्थेकडे ठेवत १ लाख १५ हजारांचे कर्ज उचलले घेते. ते पैसे तिने सलमानच्या खात्यावर वळविले होते. दोन्ही आरोपींना वडगाव न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार डबल बोनस? E-KYC प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पैसे मिळणार का? मोठी अपडेट समोर

ट्रम्प यांचा नवा टॅरिफ बॉम्ब! परदेशी औषधांवर १०० टक्के, तर किचन कॅबिनेट ते अवजड ट्रक यावरही आयात शुल्क लागणार

Jasprit Bumrah : रोहितनंतर बुमराहच्या गोलंदाजीत मोठा बदल, कैफची टीका; संतापलेल्या बुमरहानंही दिलं चोख प्रत्युत्तर...नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद १६ ऑक्टोबरला; माजी खासदार राजू शेट्टींची घोषणा

Pune News: पुण्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम : महापालिका आयुक्त स्वत, रस्त्यावर उतरले, ९२ टन कचरा उचलला

SCROLL FOR NEXT