पिंपरी-चिंचवड

पावसामुळे डांबरीकरणावर ‘पाणी’

CD

पिंपरी, ता. २६ ः पाऊस, खड्डे, दुरुस्ती आणि पुन्हा पाऊस, पुन्हा खड्डे, पुन्हा दुरुस्ती अशी रस्त्यांच्या स्थितीची वारंवारिताच जणू पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बघायला मिळत आहे. यामुळे वाहनचालकांसह सामान्य नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना म्हणून महापालिका रस्त्यांची डागडुजी करीत असून, ती तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. ‘खड्डेमुक्त रस्त्यांसाठी डांबरीकरण हाच प्रभावी उपाय’ आहे, मात्र पावसामुळे रस्ते डांबरीकरणाचे कोणतेही नियोजन नसल्याचे सांगत महापालिका प्रशासन हतबलता दर्शवीत आहे. त्यामुळे तूर्त तरी डांबरीऐवजी खड्डेमय रस्त्यांचाच नागरिकांना वापर करावा लागणार आहे.
महामार्गांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे आहेत. अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. समाविष्ट गावांमध्ये नवीन रस्त्यांसाठी खोदकाम आणि जुन्या रस्त्यांवर खड्डे अशी दुहेरी शोकांतिका आहे. मे महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू आहे. त्यापूर्वी अर्थात उन्हाळ्यात पडलेले काही खड्डे बुजवण्यापूर्वी वा डांबरीकरणापूर्वीच पाऊस सुरू झाल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. उपनगरांतील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. महापालिका प्रशासन म्हणतेय खड्डे बुजविले जात आहेत. मात्र, रस्त्यांची चाळण झालेली दिसत आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी या प्रमुख भागांसह नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, रावेत, किवळे, दिघी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. महापालिकेकडील नोंदी नुसार मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत शहरातील रस्त्यांवर सुमारे तीन हजार खड्डे पडले होते.

खोदाई सुरूच
शहरात पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज, स्थापत्य, शहरी दळणवळण, स्मार्ट सिटी, इतर काही विभागांकडून तसेच, महामेट्रोकडून रस्ते व पदपथ खोदकाम पावसाळ्यातही सुरूच आहे. त्यामुळे खड्ड्यात भर पडत आहे. निगडी ते पिंपरी मार्गावर जलवाहिनी आणि मेट्रोच्या कामासाठी दोन्ही बाजूने खोदाई केली जात आहे.

इच्छुकांनी मनावर घ्यावे
महापालिका निवडणूक येत्या चार महिन्यांत होणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्याही अधिक आहे. त्यांनी विविध कार्यक्रम वा सण-उत्सवांच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्याऐवजी आपापल्या भागातील रस्त्यांवर लक्ष देऊन त्यांची दुरुस्ती केल्यास नागरिकांना पर्यायाने मतदारांना दिलासा मिळणार आहे.

महापालिकेचे प्रयत्न
- खडी, मुरूम, पेव्हर ब्लॉक, कोल्डमिक्स, कॉंक्रिटने खड्डे व आडवे चर बुजविणे
- खड्डे नोंदणी व दुरुस्तीसाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट ॲप’ विकसित
- खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष, नियमानुसार आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवणाऱ्या २६ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

खड्ड्यांचे दुष्परिणाम
- नागरिकांचा खड्ड्यांतून प्रवास, कोंडीचा त्रास, वाहनचालकांची कसरत, वाहतूक संथगतीने
- खड्डे व पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात, सर्वच वाहनांचे नुकसान
- खडी, मुरुमाने खड्डे बुजविल्याने पावसात चिखल व कोरड्या हवामानात धुळीचा त्रास

सद्यस्थिती....
- पावसाची कधी विश्रांती, कधी धुवांधार बरसात
- कच्चे, डांबरी, सिमेंट काँक्रिटचे रस्ते; छोट्या-मोठ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे
- एकूण दोन हजार ७२ किलोमीटर अंतराचे १२ ते ८० फूट रुंदीचे रस्ते

शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या आहेत. लवकरच सर्व
खड्डे बुजविले जातील. पावसामुळे डांबरीकरणाचे अद्याप कोणतेही नियोजन नाही.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार! पण पुराच्या पाहणीसाठी नाहीतर...; मुख्यमंत्र्यांनी खरं कारण सांगून तारीखच सांगितली

'मी स्वत:ला महागौरी देवीशी रिलेट करु शकते' नवरात्रीनिमित्त तेजश्रीने शेअर केली भावनिक बाजू, म्हणाली...'मला शांतता ...'

PAK vs BAN : पाकिस्तान्यांची 'गावठी' फिल्डिंग! दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते, तरीही Run Out नाही करता आले; मजेशीर Video Viral

Sangli Politics : जयंत पाटील यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील मैदानात उतरले, सांगलीत रावण जाळून इशारा सभा घेणार

Latest Marathi News Live Update : सीना नदीच्या महापुरात दिव्यागांची घरे नव्याने उभारण्यासाठी सरसावले आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग बांधव

SCROLL FOR NEXT