- प्रा. विद्याश्री कोकणे (जेसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे)
जेसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि उन्नती डेव्हलपमेंट व ट्रेनिंग सेंटर यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. रेड हॅट लिनक्स ॲकॅडमी ऑस्ट्रेलिया यांनी समन्वय साधला. सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) आणि ओपन सोर्स लॅब स्थापन केली आहे. लिनक्स, डॉकर, कुबर्नेट, कंटेनर, पौडमॅन, स्कॉपीओ, माक्रोसर्विसेस या प्लॅटफॉर्मवर विशिष्ट लक्ष केंद्रित करून कंटेनर आणि ओपन सोर्स टेक्नॉलॉजीमधील व्यावहारिक शिक्षण, संशोधन, विकास आणि प्रगत प्रशिक्षणासाठी समर्पित केंद्र म्हणून काम करणे हा सीओईचा प्राथमिक हेतू आहे. ओपन सोर्स तंत्रज्ञान आणि संबंधित कुफलिंग एज तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे शिकण्याची आणि प्राप्त करण्याची अतुलनीय संधी यामुळे मिळाली आहे. विभागप्रमुख डॉ. कविता मोहोळकर, प्रा. रोशनी नारखेडे, प्राचार्य डॉ. एस. पी. भोसले, उपप्राचार्य डॉ. अविनाश बडधे, व्यवस्थापक प्रमुख डॉ. एस. जी. कांदालकर, संकुल संचालक डॉ. सुधीर भिल्लारे यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षक म्हणून डॉ. कीर्ती देशपांडे यांची निवड झाली.
(54042)
--
‘एक्सप्लोरिंग गेम इंडस्ट्री’ विषयी चर्चासत्र
(एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी)
आळंदीतील एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये गेम फोर्ज क्लबतर्फे ‘एक्सप्लोरिंग गेम इंडस्ट्री’ विषयावर चर्चासत्र झाले. हरिओम जगताप (संस्थापक, व्हर्च्युअल व्हेक्टर) यांनी गेमिंग इंडस्ट्रीतील प्रचंड वाढ, तंत्रज्ञानातील बदल आणि करिअरच्या संधी याबाबत माहिती दिली. या क्षेत्रात आवश्यक कौशल्ये अर्थात गेम डिझाइन, अॅनिमेशन, प्रोग्रॅमिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिएटिव्ह थिंकिंग आत्मसात करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. स्वतःच्या उद्योगातील अनुभवातून उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. डॉ. बी. बी. वाफारे (संचालक) यांनी गेमिंग इंडस्ट्री हे आजच्या काळातील सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणारे क्षेत्र असल्याचे नमूद केले. डॉ. सुनील महाजन (असोसिएट डीन- विद्यार्थी व्यवहार) यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मिळणाऱ्या संधींचा फायदा घेण्याचे आवाहन केले. प्रा. जयवंत भूमकर (क्लब समन्वयक), प्रा. प्रवीण कार्ले, प्रा. मंदार परळे, प्रा. विद्या चांदगुडे, प्रा. सचिन पोंडे व प्रा. संतोष पंडुरे यांनी संयोजन केले.
(54043)
---
जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिनानिमित्त पदयात्रा
(मराठवाडा मित्र मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय)
जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिनानिमित्त मराठवाडा मित्र मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने ‘औषधीनिर्माता आणि आरोग्याचे महत्त्व’ विषयावर महाविद्यालयापासून काळेवाडी फाटापर्यंत जनजागृतीपर पदयात्रा काढली. औषधे घेतानाची काळजी व काही औषधांचे दुष्परिणाम याच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी भित्तिचित्रे दाखविली. पथनाट्य सादर केले. सर्वांनी विविध औषधनिर्माणशास्त्र विषयाशी निगडित समाजपयोगी गोष्टींबाबत घोषणा दिल्या. प्रा. डॉ. बबिता अगरवाल यांनी संयोजन केले. प्रा. डॉ. मनोहर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
(54044)
---
एनएसएस दिनानिमित्त जनजागृती
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
एनएसएस दिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मोशीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी येथील एनएसएस युनिटतर्फे सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने ‘बी द चेंज ः एनएसएस फॉर सोशल ट्रान्झफॉर्मेशन’ घोषवाक्य देत रॅली काढण्यात आली. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. स्वयंसेवकांनी परिसरात स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक बांधीलकीबाबत घोषणाबाजी करून जनजागृती केली. ईएलसी (इलेक्टोरल लिटरेसी क्लब) जनजागृती उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व, सुजाण व जबाबदार मतदार होण्याची गरज तसेच ‘माझे मत, माझा हक्क’ संदेश फलक व पत्रकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवला. एनएसएस कार्यक्रम
अधिकारी डॉ. रेखा भालेराव, गणेश कदम, पंकज झेंडे यांनी संयोजन केले.
---
कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
(महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी)
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला. पारंपरिक शिक्षणाबरोबरच उद्योजकीय शिक्षणाची असलेली गरज त्यांनी अधोरेखित केली. कर्मवीरांनी रोवलेले कमवा आणि शिका योजनेचे बीज आज जगभर अंगीकृत केले गेले आहे, असे प्रतिपादन पंढरपूर येथील युवा उद्योजक शशिकांत कराळे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड साताराचे माजी चेअरमन साहेबराव पवार, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी उपस्थित होत्या. उद्योजक विजय कामठे, प्रमिला कामठे, संजय गायके, यशवंत गायकवाड आदींचा सन्मान केला. भाऊसाहेब वाघेरे, उपप्राचार्य सुहास निंबाळकर, डॉ. दत्तात्रय हिंगणे, डॉ. संगीता अहिवळे, डॉ. नीलकंठ डहाळे, सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ. शुभदा लोंढे, प्रा. रुपाली जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी आणि प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी केले. उपमुख्याध्यापक अश्रफ पठाण यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.