पिंपरी-चिंचवड

प्रासंगिक मेळघाट डॉक्टर

CD

प्रासंगिक ः लोगो
---
मेळघाटातील ‘सर्जिकल एक्स्प्रेस

मेळघाट म्हणजे एकेकाळी उपासमार, कुपोषणाची वेदना, अंधश्रद्धेची घट्ट पकड आणि निसर्गाच्या कुशीत जगणाऱ्या माणसांची करून कहाणी. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांचे गणित जुळत नाही. चैन आणि सुखसोयीच्या गोष्टी दूरच आहेत. अशा ठिकाणी डॉ. आशिष आणि डॉ. कविता सातव दांपत्य गेल्या २७ वर्षांपासून रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्यासमवेत पिंपरी-चिंचवडच्या डॉक्टरांनाही रुग्णसेवेची संधी आरोग्य व वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार शिबिराच्या निमित्ताने मिळाली, त्याचा आढावा...!
- डॉ. माया भालेराव, भूलतज्ज्ञ, आकुर्डी

मेळघाटवासीयांचे जीवन दुःखांनी व्यापलेले होते. आजार म्हणजे ‘देवाचा कोप’ किंवा ‘भगवान की देणं.’ औषधोपचार शब्दच त्यांच्याठायी नव्हता. झाडपाला, झाडाच्या साली, बुवाबाजी हीच त्यांची औषधपद्धती. अज्ञान, निरक्षरता आणि दारिद्र्याने त्यांना घट्ट वेढले होते. पण, त्यांच्या सेवेसाठी डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव २७ वर्षांपूर्वी धावून आले. एका छोट्या झोपडीत त्यांनी उपचार सुरू केले. आज तिचे रूपांतर ‘चॅरिटेबल हॉस्पिटल फॉर ट्रायबल पीपल’मध्ये झाले आहे. अडचणी, त्याग, कष्टाचे फळ दिसत आहे. त्याकाळी आदिवासींना डॉक्टरांवर विश्वास नव्हता. पण सातव दांपत्याने आपल्या कार्याने आजपर्यंत हजारो रुग्णांना बरे केले. हळूहळू विश्वासाची ठिणगी पेटली आणि मेळघाटात रुग्ण गंभीर आजार झाल्यास स्वतःहून हॉस्पिटलमध्ये येऊ लागलेत. त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलच्या प्रांगणात पोहोचलो. निमित्त होते आरोग्य व वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे. आठवडाभर आरोग्यदूत, आशा वर्कर्सनी गावोगावी फिरून लोकांना सांगितले होते. ऑपरेशन का करावे? त्याचे फायदे? हे काळजीपूर्वक पटवून सांगितले होते. त्यामुळे अनेक जण आले होते. रजिस्ट्रेशन, संमतिपत्र हे सगळे झाले होते. आता ऑपरेशनची ‘पायरी’ होती.
ऑपरेशन थिएटरमध्ये इन्स्ट्रुमेंट्स, गाऊन्स, इंजेक्शन, सलाईन सगळ्यांचा काटेकोरपणे बंदोबस्त केला होता. प्रत्येक रुग्णाला अँटिबायोटिक्स, सलाईन देऊन तयार केले. माइकवर सतत नावे पुकारून एक एक रुग्ण आत येत होता. मी भूलतज्ज्ञ म्हणून सज्ज होते. रुग्णांना वेदनामुक्त ठेवणे, सुरक्षित भूल देण्याचे माझे काम होते. माझ्यासह पिंपरी-चिंचवडमधील डॉ. सुधीर भालेराव, डॉ. विनीत कोल्हे, डॉ. अजय देशपांडे, डॉ. ज्ञानेश्वर गोडे आणि डॉ. सातव दांपत्य सज्ज होतो. चार टेबलांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया सुरू केल्या. हर्निया, गर्भाशयाचे आजार-गाठी, पाइल्स, फिस्टुला, डोळ्यांतून वाहणारे पाणी अनेक आव्हानात्मक केसेस होत्या. एकामागोमाग एक रुग्ण सर्जरी करून वार्डमध्ये शिफ्ट केल्या जात होते. भूलतज्ज्ञ, सर्जन, ओटी स्टाफ, वार्ड सिस्टर्स सर्वांचा समन्वय साधून काम केल्यास खूप आनंद होतो. याची अनुभूती घेत आमची ‘सर्जिकल एक्स्प्रेस’ जोरात धावत होती. दीड दिवसात ५० सर्जरी यशस्वी केल्या. या सर्वांचा ऊर्जास्रोत म्हणजे डॉ. सातव दांपत्य. डॉ. आशिष उत्तम फिजिशियन असून, त्यांनी कोविडच्या काळात मेळघाटात एकट्याने शेकडो जीव वाचवले. आता ‘मॅडम, तुम्ही भूल द्या, मी पोस्ट-ऑप बघतो’ या त्यांच्या एका वाक्याने हाय रिस्क पेशेंट्सला भूल देण्याचे धैर्य मिळाले. डॉ. कविता नेत्रतज्ज्ञ आहेत. हजारो डोळ्यांना त्यांनी नेत्रसुख दिले आहे. असंख्य मोतीबिंदू शस्त्रक्रियांनी नवा विश्वास दिला. या दांपत्याचा उत्साह अफाट आहे. त्यांना साथ देणारी टीम समीर पळस्कर, अविनाश-शिल्पा सातव आणि इतर सगळे निःस्वार्थीपणे काम करतात. शिबिरात आम्हाला डॉ. संजय देवतळे, डॉ. अभिजित भारद्वाज, डॉ. प्रशांत गहूकर यांचे मोलाचे योगदान लाभले. डॉ. सातव यांनी आज मेळघाटात आरोग्याचा आलेख उंच नेला आहे. मेळघाटाच्या अंधारात त्यांनी आशेचा दिवा पेटवला आहे. त्यांच्या सेवेला शतशः सलाम!
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport : पुणे विमानतळावर 'ए-३२१' विमानांची 'भरारी'! प्रवासी क्षमता ४० ने वाढली, एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या ३५ हजारांवर

Viral Video 'नेहा कक्करने टीशर्टवर घातली ब्रा' नेटकरी म्हणाले...'आवरा जरा हिला' व्हिडिओ चर्चेत

Latest Marathi News Live Update: : उल्हासनगरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची रिक्षाचालकाला मारहाण

Car Accident: कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू; जबलपूर मार्गावर भीषण अपघात, कांद्रीत संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

Smriti Mandhana Sangeet: तेनु लेके मैं जावांगा... स्मृती-पलाशचा रोमँटिक डान्स; तर जेमिमाहसह महिला क्रिकेटपटूंनीही धरला ठेका

SCROLL FOR NEXT