पिंपरी-चिंचवड

विज्ञान, गणितीय कृतींतून अनुभवाधारित प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. २८ : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे ‘कल्पकघर’च्या वतीने महापालिकेच्या १०८ शिक्षकांसाठी प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने, ‘स्टेम’ (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स) विषयांवर आधारित कृतियुक्त अध्यापन पद्धतीने कसे शिकवावे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कालावधीत ७०० शिक्षक, पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क डॉ. श्रद्धा खंपरिया, शिक्षण अधिकारी एन. टी.कासार आणि सुनील पोटे आदी उपस्थित होते. यावेळी ‘कल्पकघर’च्या टीमकडून सादर केलेल्या कृतियुक्त अध्यापन पद्धतींमध्ये शिक्षकांनी सुमारे ४० विज्ञान व गणितीय कृतींचा अनुभव घेतला. यात पृथ्वी-चंद्र मॉडेल, विविध ध्वनीवर आधारित प्रयोग, वर्तमानपत्रापासून विविध भूमितीय आकार समजून घेणे, गणितीय कोडी, ब्रेन कॅप, पानाची त्रिमितीय प्रतिकृती यांसारख्या कृतींचा समावेश होता. तसेच, गिअर मेकॅनिक्स आणि कल्पकघरमधील इतर टिंकरिंग लॅब साधनांचा वापर करून प्रात्यक्षिक देण्यात आले. २८ फेब्रुवारी २०२६ राष्ट्रीय विज्ञान दिनापर्यंत ६० गुण मिळवणाऱ्या शिक्षकांना ‘कल्पकघर’कडून सन्मानित केले जाणार आहे.
दरम्यान, मनपा शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता बांगर, ‘आयसर’चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी अशोक रुपनेर आदींनी मार्गदर्शन केले.


कार्यशाळेची उद्दिष्टे
- शिक्षकांना ‘स्टेम’ विषयांच्या प्रयोगाची हाताळणी व वर्गात शिकविण्यासाठी वापर करता यावा
- शिक्षकांना नावीन्यपूर्ण अध्यापनासाठी साहित्य उपलब्ध करून देणे
- शाळांसाठी ‘स्टेम’ हाताळणी कार्यक्रम विकसित करणे
- विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानातील भविष्यातील संधीचा परिचय करून देणे

कमी खर्चात करता येतील, अशी अनेक प्रकल्पांची साधने आमच्याकडे आहेत, जी शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड मनपा शाळांमधील विद्यार्थी प्रोजेक्ट-आधारित शिक्षणाशी जोडले जातील.
- अंकिश तिरपुडे, समन्वयक, कल्पकघर व तांत्रिक अधिकारी, ‘आयसर’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मोठी बातमी! अमृतसर सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डब्बे गाडीपासून वेगळे झाले, मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली

IND vs PAK Final: सूर्यकुमार यादवच्या बॅटवर सचिन तेंडुलकरचा 'खास' संदेश; पाकड्यांचं आता काही खरं नाही; काय लिहिलंय असं?

Jalgaon News : दिवाळीत पुणे-जळगाव प्रवासासाठी विमानसेवेला 'पसंती'; महिनाभराअगोदर तिकीट बुकिंग जोमात

Crime News : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या दोघा भावांवर झाडल्या गोळ्या; मेहुण्यानेच जेलमधून 'या'मुळे घडवले दुहेरी हत्याकांड

Explained: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय? रक्तातील साखर कमी होण्यापासून बचावासाठी पाळा या सोप्या सवयी!

SCROLL FOR NEXT