पिंपरी-चिंचवड

फिजिओथेरपीपीमधील गुणवंतांचा सत्कार

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ ः पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात फिजिओथेरपी क्षेत्रात पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, १५ वर्षांहून जास्त काळ सेवा देणारे चिकित्सक तसेच विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला. ‘इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स वूमन्स सेल’ची (आयएपीडब्लूसी) पीसीएमसी शाखा आणि ॲकॅडमिक पार्टनर संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन (सीओपीटी) यांच्या वतीने पुण्यातील संचेती रुग्णालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी डॉ. नीलिमा बेडेकर, आयएपी पुणे शाखेचे डॉ. तुषार पालेकर, आयएपीडब्लूसीच्या जिल्हा समन्वयक डॉ. वर्षा कुलकर्णी, संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. राधा भट्टड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. जुईली मुढळकर, प्रियांका गौरव, लज्जा ऋषी, विपिन बानुगडे, साची तिनैकर, सोनल बियाणी, माधुरी राजभर, शर्वरी दारवेकर, मानव राजपुरोहित, सलोनी भंडारी, रश्मी कोचेटा, सागरिका पटवर्धन, याशी शाह, तेन्झिन युदोन, तनया केंकरे, प्रीती दांगी, गायत्री विभुते, भक्ती देढिया, आर्या गुने, अनया महाजन, गायत्री राजगुरू, सुकृती खेडेकर, नुहा शेख, आयुषी अमृतकर, उन्नती अहिरराव, साक्षी बिबवणकर, आर्या देव, सृष्टी घोडेराव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड महिला सेलच्या जिल्हा समन्वयक डॉ. संजीवनी कांबळे, उपसमन्वयक डॉ. फरहीन पटेल, डॉ. मयूरा देशमुख आणि डॉ. स्मिता शिंदे यांनी केले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT