पिंपरी-चिंचवड

चालकांनो हेल्मेट वापरा; वेगमर्यादेचे पालन करा

CD

पिंपरी, ता. ३० : दुचाकीवरून प्रवास करताना चालकांनी हेल्मेटसारख्या सुरक्षा साधनांचा वापर करावा, तसेच वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन डॉ. मंदार ताम्हणकर यांनी केले.
‘झिरो अपघात-माझी जबाबदारी’ हा संदेश देण्यासाठी डॉ. ताम्हणकर यांनी ऑस्ट्रेलिया खंडाला दुचाकीवरून प्रदक्षिणा घातली. त्यांच्या या मोहिमेची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ तसेच ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. यानिमित्त कासारवाडी येथील वाहनचालक आणि प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र मोटारचालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रस्ता सुरक्षा व महामार्ग अभियांत्रिकीतील नवकल्पना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रस्ते बांधणी तज्ज्ञ आणि ऑस्ट्रेलियन पदकाचे मानकरी डॉ. विजय जोशी यांनी प्रगत उपक्रमांची माहिती दिली. या वेळी भारतात सुरक्षिततेसाठी नवकल्पनांची अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली. खड्डे विरहित रस्ते निर्मितीबाबत तंत्रज्ञानाची माहितीही देण्यात आली.
‘आयटीडीआर’चे प्राचार्य संजय ससाणे, राज्य मोटर चालक संघटनेचे अध्यक्ष विजय दुग्गल, लेखक निखिल दाते यांनी मनोगत व्यक्त केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

Kolhapur building slab collapse : कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला ; अनेकजण अडकल्याची भीती

V. S. Gaitonde : मराठी माणसाने काढलेलं चित्र चक्क 67 कोटींना, कोण होते जगप्रसिद्ध चित्रकार व्ही. एस. गायतोंडे?

Pune News : जिल्हा परिषदेची शाळा ठरली जगातील सर्वोत्तम; जालिंदरनगरच्या शाळेला मिळणार एक कोटी रुपये

Pune University : विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहाराचे निघाले वाभाडे! विद्यापीठाच्या आर्थिक गैरव्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ होणार

SCROLL FOR NEXT