पिंपरी-चिंचवड

सांगवडे-मामुर्डी मार्ग वाहनांसाठी बंद

CD

पिंपरी, ता. ३० : सांगवडे येथील लोखंडी पूल धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर दगडगोटे टाकून वाहतूक बंद केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक मदतीने नवीन पर्यायी पुलाचे काम सुरू केले. पण, पावसाळ्यामुळे पूल बांधणी मंदगतीने होत आहे. या कामाला वर्षभरापेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूल बंद असल्याने सांगवडे-मामुर्डीमार्गे पुणे, पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या शेतकरी, प्रवाशांची गैरसोय होत आहे.

वाहनांची सुविधा नाही. त्यातच पर्यायी मार्ग दूरचा असल्याने सांगवडे येथून मामुर्डीकडे जाणारे आणि परतीच्या मार्गावरील दुचाकीस्वार पुलाजवळ गाडी उभी करून साहित्य-ओझे डोक्यावरून वाहून नेत आहेत. दगडांतून मार्ग शोधत, कसरत करत नागरिक पायपीट करत आहेत. तसेच पूल पार केल्यानंतर दोन्ही बाजूला पुढे जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्याने नागरिकांना मामुर्डी पुलापर्यंत पायी जावे लागत आहे. दळणवळणासाठी होत असलेली ही परवड थांबवण्यासाठी सांगवडे नवीन पुलाचे काम वेगाने करावे, अशी मागणी होत आहे.

PNE25V55951

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy Video : ''मुख्यमंत्रीजी, जर तुम्हाला बदलाच घ्यायचा असेल तर, मला.." ; विजय थलपतींचं थेट आव्हान!

Latest Marathi News Live Update: शुल्क वाढ रद्द करा...; पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून पोस्टरबाजी

Asaduddin Owaisi : जादूगाराच्या मोहजालातून बाहेर पडा; युवकांनी प्रश्न विचारल्यानंतर अवघड होईल

औरंगजेबानंतर आता ‘असुरगुरू शुक्राचार्य’! ‘महाकाली’च्या फर्स्ट लुकमध्ये ओळखता सुद्धा येईना, पोस्टर व्हायरल

Nashik Crime : 'येथे लघवी करू नको' म्हणताच चाकू भोसकला; सुधारगृहातून पळून आलेल्या संशयिताने केला दुसरा खून

SCROLL FOR NEXT