आकुर्डीत गटाराची दुरवस्था
गेल्या दोन आठवड्यांपासून आकुर्डीच्या विठ्ठलवाडी भागात विवेकनगर सोनिगरा बिल्डिंगच्या बाजूला ट्रिनिटी स्कूलच्यासमोर रस्त्यावरील गटार फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डा झाला आहे. त्याने अपघाताचा धोका आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करावी.
- नितीन मोरे, विठ्ठलवाडी, आकुर्डी
Id: PNE25V55957
टेम्पोचालकांवर कारवाई करा
सध्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक हातगाड्या, तीन चाकी टेम्पो रस्त्यावर उभे करुन भाजी, फळे विकली जातात. जुनी रस्टन कंपनी, आकुर्डी पेट्रोल पंप, निगडी - भोसरी टेल्को रस्ता, सायन्स पार्क, एमआयडीसी चिंचवड भागांत हे प्रकार दिसतात. परंतु त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकी चालकांना होतो आहे. पोलिस प्रशासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई करावी.
- रूपेश धनवे, दळवीनगर, चिंचवड
PNE25V55954
बेवारस वाहने हटवा
अनेक रस्त्यांवर बेवारस वाहने, टाकाऊ साहित्य, भंगार साहित्य, राडारोडा पडून आहे. अतिशय वाहतूक, गर्दीच्या चिंचवड ते चापेकर चौक रस्त्यावर अनेक महिन्यांपासून बेवारस वाहने पडून आहेत. त्याने वाहतुकीस अडचण होत आहेत. या वाहनांभोवती कचरा, घाण, चिखल, टाकाऊ साहित्य, भंगार साहित्य जमा होऊन शहर बकाल व विद्रूप होत आहे. महापालिका आयुक्तांचे बेवारस वाहनांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्याबाबत लेखी आदेश आहेत. तरी देखील बेवारस वाहनांवर कारवाई होत नाहीत. तरी महानगरपालिकेने पदपथ, रस्त्यावरील बेवारस वाहने, टाकाऊ, भंगार साहित्य, राडारोडा हटवून रस्ते वाहतुकीस उपलब्ध करून देण्यात यावेत.
- दिलीप बाफना, चिंचवड
PNE25V55955
तळेगाव-वराळे रस्त्यावरचा खड्डा बुजवा
नागरिकांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी न घेता तळेगाव - वराळे रस्त्यावर बाजूच्या पट्टीवर पोदार बालक शाळेसमोर रस्ता खोदलेला आहे. हा चर धोकादायक आहे. तरी संबंधित विभागाने त्याची दुरुस्ती करावी.
- एक पादचारी, तळेगाव दाभाडे
E25V55956
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.