नवदुर्गा
--
शिक्षण, साहित्य क्षेत्रांतील ‘पंडित’
पर्यवेक्षिका, कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या, आर्दश शिक्षिका अशा अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत इतरांना प्रेरणा देणाऱ्या श्यामला पंडित-दीक्षित यांची अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमध्ये १९९२ पासून अध्यापन करताना त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. निमगाव केतकी, कापूरहोळ, नसरापूर, कामशेत, चऱ्होली, मोशी, आकुर्डी अशा शाखांमधून अध्यापन केले. १०० टक्के निकाल परंपरा निर्माण करत विद्यार्थ्यांना मराठी विषयाची गोडी लावली. सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांचे ‘अमृतकुंभ’, ‘स्वर्गफुल, ‘काव्यधारा, ‘शब्दांकुर, ‘दरवळ, ‘झुळूक, ‘अष्टपैलू, ‘स्वानंद, ‘शब्दझुला, ‘श्यामलाक्षरी, ‘पुष्पजली, ‘फलोक्ती’ हे कवितासंग्रह, ‘प्रेमाचा जिव्हाळा’, ‘भावतरंग’, ‘शब्दकमले’ चारोळी संग्रह, ‘भावदर्पण’ कथासंग्रह प्रकाशित आहेत. ‘अष्टाक्षरी’ काव्यरचना विशेष उल्लेखनीय आहे.
समान शब्दांचे वेगवेगळे अर्थ वापरून त्यांनी केलेल्या काव्यनिर्मितीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साहित्यविश्वात त्यांना वेगळे स्थान मिळाले आहे. समाजसेवेतही त्या सक्रिय आहेत. महिला बचत गटांना मार्गदर्शन, भजनी मंडळ, सूत्रसंचालन, सामाजिक उपक्रमातून कार्यक्षेत्र विस्तारले. पिंपरी-चिंचवड महापालिका, ‘पीडीइए’ या संस्थांसह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका’, ‘साहित्यरत्न’, ‘अण्णा भाऊ साठे’, ‘छावा काव्य’ आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. अध्यापन, लेखन, संस्कृती आणि समाजसेवा क्षेत्रांत त्यांनी उमटविलेला कार्याचा ठसा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
--
PNE25V56266
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.