पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

चऱ्होलीच्या रस्त्यावर पाणी
चऱ्होली बुद्रूक येथील गावठाणातील मुख्य रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावून रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होते आणि दुर्गंधी पसरुन आरोग्य धोक्यात येत आहे. अनेकवेळा दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरते. त्याने मोठे आर्थिक नुकसान होते. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या गटारांची/नाल्यांची तत्काळ तपासणी करून ती पूर्णपणे स्वच्छ करावीत, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल. पाणी साचणाऱ्या ठिकाणी रस्त्याची उंची तपासून त्यात आवश्यक बदल करावेत आणि रस्त्याला योग्य उतार द्यावा.
- स्वप्नील गाढवे, चऱ्होली बुद्रुक
PNE25V56495


बेशिस्त पार्किंग हटवा
लिंक रोडवरील इंद्रलोक सोसायटी येथे एक डोसा फास्ट फूडचे सेंटर सुरू आहे. इथे दररोज सकाळी खाद्य पदार्थ घेण्यासाठी ग्राहक येत असतात. त्यांची वाहने पदपथावर व सोसायटीच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावर चालत जाणे अवघड होते. काही बोलायला गेले तर उलट उत्तरे मिळतात.
- जगन्नाथ पांढरे, चिंचवड
PNE25V56492


चऱ्होलीतील सिग्नल चालू करा
मागील पाच आठवड्यांपासून पुणे- आळंदी रस्त्यावरील चऱ्होली येथील बालाजी मंदिर मुख्य रस्त्यावरचा वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहने भरधाव वेगाने जातात. कोणालाही रस्ता ओलांडणे किंवा चौकातून वळण घेणे अत्यंत धोकादायक झाले आहे. अपघाताची भीती सतत जाणवते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागते. महानगरपालिकेने त्वरित याची दखल घेऊन तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सिग्नलची दुरुस्ती/देखभाल करून तो तत्काळ सुरू करावा.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
PNE25V56493


महावितरणचा क्यूआरकोड स्पष्ट हवा
सर्वांना वीज बिले येतात. बरेच जण ऑनलाईन वीज बिल भरतात. पण, कधी कधी स्कॅन होत नसल्याने ग्राहकांना बिल भरण्याकरिता रांगेमध्ये उभे राहून भरायला लागते. तरी कृपया करून महावितरण विभागीय कार्यालयातील क्यूआर कोड स्पष्ट दिसेल अशी व्यवस्था करण्यात यावी.
- श्रीरंग जाधव, पिंपरी
PNE25V56490


काळेवाडी दवाखाना स्थलांतरीत करा
काळेवाडी येथील दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. फरशा उखडलेल्या अवस्थेत आहे. दवाखान्याच्या समोरच सांडपाणी, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या गेलेल्या आहेत. त्यावरचे झाकणे अर्धवट निघाल्याने दुर्गंधी सुटलेली आहे. दुर्गंधीमुळे डेंगी, हिवताप यासारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शिवाय दवाखान्याला मोठ्या प्रमाणावर हातगाडी, पथारी व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहे. स्थानिकांनी अनेकदा हा दवाखाना स्थलांतरित करावा अशी मागणी केली. परंतु वैद्यकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V56491

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kidney failure: किडनी फेल झाल्याने सहा मुलांचा मृत्यू; कफ सीरपने घेतला चिमुकल्यांचा जीव

Andekar Gang: आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात! कोट्यवधीची खंडणी घेतल्याचा आरोप, तक्रार दाखल करत फिर्यादी म्हणाला...

Viral Video: शाळेच्या मिटिंगमध्ये महिलेने सर्वांसमोरच कपडे काढले अन्... व्हिडिओ होतोय व्हायरल

Diwali Rashi Bhavishya 2025 : दिवाळीत 'या' 4 राशींवर होणार धन वर्षाव ! शक्तिशाली योगांमुळे होणार लक्ष्मीमातेची कृपा

MP Hemant Savara : ठाणे–पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा; मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडे तात्काळ मदतीची केली मागणी

SCROLL FOR NEXT