पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

ग्रेडसेपरेटरमध्ये सातत्याने पाणीगळती
चिंचवड स्टेशन येथील ग्रेडसेपरेटरमध्ये २०२० पासून भिंतीतून सतत पाणी वाहते. याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्याचबरोबर या ग्रेडसेपरेटरची संरक्षण भिंत कमकुवत होऊन खचण्याची भीती आहे. यापूर्वी दोन वेळा संरक्षण भिंत ढासळलेली आहे. ती संरक्षण भिंत पुन्हा उभारण्यात आलेली आहे. तरीही या पाणी गळतीमुळे धोकादायक परिस्थितीकडे वाटचाल करीत असलेल्या ग्रेडसेपरेटरकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करून अपघाताला निमंत्रण देत आहेत. पण, देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून जबाबदारी निश्चित होत नाही. एखादा अनर्थ घडल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का?
- बी. एस. पाटील, संभाजीनगर
PNE25V56844

पुलावर उगवलेले झाड हटवले
निगडीत पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या भक्ती-शक्ती उड्डाणपुलाच्या एका भिंतीवर एक पिंपळाचे झाड उगवले होते आणि ते मोठेही झाले होते. यामुळे पुलाला धोका होण्याची भीती होती. याबद्दल काही दिवसांपूर्वी मी ‘सकाळ टुडे संवाद’ या सदरात ही माहिती छायाचित्रासह दिली होती. यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन हे झाड मुळापासून काढल्याचे दिसत आहे. शिवाय, तेथे काँक्रीटीकरणही करण्यात आले आहे. यामुळे पुलाला असलेला धोकाही टळला आहे.
-शिवराम वैद्य, निगडी
PNE25V56847

पिंपळे निलख येथील पुलाला बकालपणा
पिंपळे निलख येथील इंगवले पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यावर कचरा, गवत साचले आहे. पुलाच्या कठड्याचा रंग उडून गेल्यामुळे पुलाला बकाल स्वरूप आले आहे. हा परिसर गावठाण व नव्याने झालेल्या गृहनिर्माण संस्था अशा स्वरूपाचा आहे. येथे नागरिक व्यायामासह फिरण्यासाठी सदर पुलावर येतात. पण, पुलाची दुरवस्था पाहून त्यांची निराशा होत आहेत. प्रशासनाने या पुलाला रंगरंगोटी करावी. येथील गवत तातडीने काढावे, अशी आमची मागणी आहे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V56845

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना

Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: गरोदर महिलेचा खून करून फेकले रस्त्याचा कडेला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर..

SCROLL FOR NEXT