पिंपरी, ता. ३ ः सकाळ माध्यम समुहाच्या वतीने चऱ्होली येथे आयोजित करण्यात आलेल्या वास्तू एक्स्पोचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्या शनिवारी (ता. ४) होणार आहे. या एक्स्पोमध्ये शहरातील बजेट घरांपासून ते लग्झरिअस घरापर्यंत आणि शॉपपासून ते कमर्शिअल प्रॉपर्टीपर्यंत मालमत्ता खरेदी करण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. शनिवारी-रविवारी वास्तू एक्स्पोमध्ये सर्वांना खुला प्रवेश असेल.
चिंचवड शहरातील वाढत्या सोयीसुविधा आणि प्रगतिशील वातावरणामुळे येथे घर घेण्यास नागरिकांची पसंती वाढत आहे. पुणे तसेच इतर भागांतील अनेक कुटुंबेही भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा शहरात स्वतःचे घर घेण्यास प्राधान्य देत आहेत. मुलांचे शिक्षण, नोकरीतील संधी आणि भविष्यातील स्थैर्य यामुळे गावाकडे न थांबता शहरात घर घेण्याकडे कल वाढत आहे.
शहर मोठे असल्याने अल्पावधीत विविध गृहप्रकल्प पाहणे आणि त्याबाबत सविस्तर माहिती मिळवणे अनेकदा शक्य होत नाही. यामुळे नागरिकांच्या सोईसाठी ‘सकाळ’ने एक्स्पोचे आयोजन केले आहे. यामध्ये एकाच छताखाली विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प पाहता येणार आहेत. आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार घर निवडून त्वरित बुक करण्याची सुवर्णसंधी येथे उपलब्ध होणार आहे. दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधून स्वतःचे घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही संधी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे घर शोधत असाल, तर वेळ काढून ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला नक्की भेट द्या.
---------
वैशिष्ट्ये
- वन बीएचकेपासून थ्री बीएचकेपर्यंत घरे
- कमर्शिअल आणि एनए प्लॉटसुद्धा
- वीसपेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांचे शंभरपेक्षा जास्त गृहप्रकल्प
- एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांची माहिती
- कर्ज मंजूर करण्याची सुविधा
- पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कसा घ्यावा याची माहिती
----
काय? कुठे ? कधी ? केव्हा ?
काय? ः ‘सकाळ’ वास्तू एक्स्पो
कुठे? ः चंद्रफूल गार्डन, आळंदी-पुणे पालखी मार्ग, वडमुखवाडी, चऱ्होली
कधी? ः शनिवार (ता. ४ ऑक्टोबर) आणि रविवार (ता. ५ ऑक्टोबर)
केव्हा? ः सकाळ ११ ते रात्री ८
अधिक माहितीसाठी संपर्क ः ९५६१३१४६७९
-------
सकाळ वास्तू एक्स्पोमध्ये घर घेणाऱ्या ग्राहकांसाठी खास सवलत योजना आणली आहे. प्रथम घर घेणाऱ्या ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. उर्वरित कर्जाची रक्कम कमी व्याजदराने मंजूर केली जाईल. गृहकर्ज प्रक्रिया पार पाडण्यासाठी कागदपत्रांची जंत्री राहणार नाही. पगारदार ग्राहकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पगारपत्र सोबत आणावे. व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आयटीआर याच्या प्रति सोबत ठेवाव्यात. अवघ्या ३० मिनिटांत कर्ज मंजूर करून दिले जाईल.
- निखिल विधाते, टीम मॅनेजर, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड
--------
शहरात भविष्यात डीपी रस्ते विकसित होणार असून चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. नवीन आयटी पार्कमुळे नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येथून लोहगाव विमानतळ दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. भविष्याचा विचार करून या भागात गुंतवणूक करणे ग्राहकांच्या फायद्याचे आहे. त्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून चऱ्होलीमध्ये आम्ही गृह प्रकल्प विकसित केले आहेत. त्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करत आहोत.
- अनिरुद्ध तापकीर, संचालक, ब्रम्हांड वर्ल्ड रिॲलिटी ग्रुप
------
येथे वेगाने होणारा विकास आणि उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे भविष्याचा विचार करता चऱ्होलीत मिळकत घेणे ग्राहकांसाठी फायद्याचे आहे. याचे कारण, पिंपळे सौदागर, वाकड, वाघोलीतील घरांच्या दराच्या तुलनेत चऱ्होलीत आम्ही कमी किमतीमध्ये अधिक चटई क्षेत्रफळाची घरे देत आहोत. आपल्या तथास्तू गृह प्रकल्पापासून १८ मीटर रोड जातो. केवळ एक किलोमीटरवर प्रस्तावित ९० मीटर इनर रिंगरोड आहे. शाळा जवळ आहे, पीसीएमसीचे उद्यान, आळंदी-देहू ही देवस्थाने जवळ आहेत. येथे घर घेण्याचे अनेक फायदे आहेत.
- एन. के. सिंग, सेल्स हेड, केशव ग्रुप
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.