पिंपरी-चिंचवड

रानफुलांनी बहरला घोरावडेश्वर डोंगर

CD

सोमाटणे, ता. ४ : घोरावडेश्वर डोंगर सध्या रानफुलांनी बहरला असून भाविकांबरोबरच पर्यटकांचीही मोठी गर्दी येथे होत आहे. फुलांच्या गालिच्यावर सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची पावले घोरावडेश्वरकडे वळली आहेत.
दरवर्षी सप्टेंबरच्या मध्यावर डोंगरावर रानफुले उमलतात व महिन्याच्या अखेरीस कोमेजतात. मात्र, यावर्षी सतत झालेल्या पावसामुळे फुलांना उशिरा बहर आला. सप्टेंबरच्या शेवटी फुलोरा दिसू लागला असून सध्या संपूर्ण डोंगर रानफुलांच्या पिवळ्या फुलांनी नटला आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने डोंगरावर भाविकांसह पर्यटकांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे. हिरवागार डोंगररांग आणि त्यावर बहरलेली रानफुले यामुळे मनोहारी दृश्य निर्माण झाले असून पर्यटकांसाठी फोटो व सेल्फीसाठी ही पर्वणी ठरली आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच शहरी भागातील पर्यटक डोंगरावर भटकंतीसाठी येत असून अनेकजण घोरावडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन वनभोजनाचा आनंद घेत आहेत.
PNE25V57129
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरन्यायाधीशांचा शपथविधी होणार ऐतिहासिक, ब्राझीलसह ७ देशांचे न्यायमूर्ती राहणार उपस्थित; पहिल्यांदाच 'असं' घडणार

Kolhapur Elecion: आजऱ्यात घरासमोरील ‘तो’ फलक चर्चेत; मतदान का करायचे; मतदाराचा सवाल,समाजमाध्यमांवर धूम

Pune Police : पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्य प्रदेशात जाऊन पिस्तूल कारखाने केले उद्ध्वस्त, ४७ जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : कन्हान -पिंपरी नगर परिषद निवडणूकीत काँग्रेसला धक्का

रोहित शर्मा कर्णधार म्हणून कमबॅक करणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी घोषणा होण्याची शक्यता...

SCROLL FOR NEXT