पिंपरी, ता. ४ ः पिंपरी चिंचवड माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त चिखलीतील साने चौकात माहिती अधिकार (आरटीआय) जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.
‘‘देशात माहिती अधिकार कायदा, २००५ची अंमलबजावणी व्हावी यासाठी अण्णा हजारे यांनी संघर्ष केला. त्यानंतर हा कायदा अंमलात आला. परंतु आजही पाहिजे तेवढी कायद्याबाबत जनजागृती होताना दिसून येत नाही. त्यामुळे दरवर्षी माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन नागरिकांना माहिती माहिती दिली जाते,’’ असे प्रतिपादन शहराध्यक्ष नीलेश केवट यांनी केले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर आणि माहिती अधिकार महासंघाचे कार्यकर्ते, अधिकारी नागनाथ माळी, गणेश हुलसुरे, संदीप पाटील, चंद्रकांत उदगीरे, मधुकर बने, धनाजी पाटील, संतोष टकले, रजनी केवट, शीला शिंदे उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.