पिंपरी-चिंचवड

‘सकाळ वास्‍तू एक्‍स्‍पो’तून घराची स्‍वप्‍नपूर्ती

CD

पिंपरी, ता. ५ : दसरा सणाच्‍या शुभ मुहूर्तावर आयोजित ‘सकाळ वास्‍तू एक्स्पो’चा ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप झाला. हक्काचे घर विकत घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांनी या ‘एक्स्पो’ला भेट दिली. सलग दोन दिवस हे प्रदर्शन सुरू होते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मोशी, चऱ्होली, चिखली, वडमुखवाडी या भागातील नागरिकांसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही अनेकांनी ‘एक्स्पो’ला आवर्जून भेट दिली. येथील विकसकांकडून सादर करण्यात आलेल्या विविध गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांनी प्रत्यक्ष घेतली.
मोशी, चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वेग घेत आहे. निसर्गरम्य परिसर, कमी वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या जलद विकासामुळे या भागात स्थायिक होण्यास अनेक जण उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ वास्‍तू एक्स्पो’ नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरला. एक्स्पोमध्ये वन, टू आणि थ्री बीएचके सदनिकांची माहिती, किंमती, परिसरातील सुविधा आणि गृहकर्जविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. ‘‘योग्य किंमतीत घर कोठे मिळेल?’’ या प्रश्नाचे समाधान अनेकांना या प्रदर्शनातून मिळाले.
दोन दिवस चाललेल्या या एक्स्पोमुळे विकसक आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद घडला. त्यामुळे नागरिकांना नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळाली, तर विकसकांना संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर घर खरेदीचा शुभ मुहूर्त साधण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.


मोशी, चऱ्होली या भागात वन बीएचके घेण्याचा आमचा विचार आहे. या एक्‍स्‍‍पोमध्ये विविध सदनिकांची माहिती मिळाली. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा दर हवा. या भागात कमी दर आहेत. त्‍यानुसार या ठिकाणी येऊन माहिती घेतली.
- रोहन साळुंखे, चऱ्होली.
५७५२२

मोशी, चिखली, चऱ्होली परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांचे वास्तव्य आहे. या भाग आध्यात्मिक, शांत व चांगला आहे. या ठिकाणी टू आणि थ्री बीएचकेला जास्त महत्त्व वाढले आहे. त्‍यामुळे या भागात राहण्यासाठी प्राधान्‍य देत आहे.
- सचिन लोखंडे, चऱ्होली.
५७५२३
चऱ्होली, वडमुखवाडी या भागात आम्‍ही प्‍लॉट आणि रो हाऊस शोधत आहोत. जागा कमी राहिलेल्‍या आहेत. कुठे जागा उपलब्ध आहेत का, हे पाहायला या ठिकाणी आलो होतो.
- पद्मजा जंगम, इंद्रायणीनगर, भोसरी.
५७५२४
चऱ्होलीत आमची दोन घरे आहेत. आणखी एक सदनिका पाहतोय. ‘रिव्हर नेस्ट’मध्ये सदनिका घ्यायची आहे. त्‍यानुसार त्‍या ठिकाणी येऊन आम्‍ही सर्व माहिती घेतली.
- भक्ती भोर, चऱ्होली.
५७५२५

PNE25V57521

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT