पिंपरी-चिंचवड

व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांचे स्वागत

CD

(डॉ. डी. वाय. पाटील मॅनेजमेंट स्टडी)
आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील मॅनेजमेंट स्टडीतील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ॲडमिरल (निवृत्त) अमित विक्रम, कार्यकारी संचालक डॉ. भरत चव्हाण, सुप्रिया पाटील, व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्वेता चव्हाण, डॉ. जे. जे. पाटील, प्रभारी संचालक डॉ. ललित प्रसाद उपस्थित होते. उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट प्राध्यापकांना गौरविले. २०२२-२४ चे बेस्ट ऑल राऊंडर स्टुडंट्‍स सायली कदम (सुवर्ण पदक), तेजस्विनी काकडे (रौप्य पदक), प्रीती नाईकनवरे (कांस्य पदक) आणि २०२३-२५ या शैक्षणिक वर्षातील सोनाली गावकर (सुवर्णपदक), सानिका काटकर (रौप्यपदक), अनिकेत मानवा (कांस्यपदक) यांनाही गौरविले. सूत्रसंचालन प्रा. मीनल वाघ यांनी केले. आभार डॉ. सोनाली पाटील यांनी मानले.

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह
(माईर्स एमआयटी महाविद्यालय)
माईर्स एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यातर्फे ‘पुस्तकांमधून जीवनाचा उलगडा करा’ विषयावर ग्रंथालय सप्ताह व एनएसएस सप्ताह उत्साहात साजरा झाला. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, उपसंचालक डॉ. मानसी अतितकर, डॉ. अक्षदा कुलकर्णी उपस्थित होते. ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. राहुल बाराथे, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. अरविंद वागस्कर यांनी संयोजन केले. नीलेश मते, सारिका पडवळ, सुवर्णा सानप यांचे सहकार्य लाभले.

आरोग्य तपासणी शिबिर
(डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेज)
आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये आरोग्य शिबिरात २०० जणांची तपासणी केली. रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबीन, बीएमआय आणि फुप्फुसाचे आरोग्य आदी तपासण्या केल्या. फार्म. डी.च्या विद्यार्थ्यांनी संयोजन केले. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. रामदास शिंदे, डॉ. संकेत कदम, डॉ. अभय शिंदे, डॉ. ऐश्वर्या उंचेगावकर आणि डॉ. निकिता पारगे उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी कुमकुम भेनवाल आणि गौरव गायकवाड यांनी संयोजन केले.

सामंजस्य करार आणि विद्यार्थी संवाद
(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स)
चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्समधील (आयआयएमएस) एमबीएच्या विद्यार्थ्यांशी तज्ज्ञांनी संवाद साधला. औद्योगिक विकासप्रक्रियेत मनुष्यबळ व्यवस्थापकांची भूमिका महत्त्वाची असून बदल आणि धोरणात्मक प्रक्रियेतील त्यांचा सहभाग मोलाचा असतो, असे मत मॉरिशस येथील ला सेंटिनेल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मॉरिशस मनुष्यबळ व्यवस्थापक संघटनेचे अध्यक्ष आरिफ सलारू यांनी व्यक्त केले. यावेळी आयआयएमएस व मॉरिशसची मनुष्यबळ व्यवस्थापक संघटना यांच्यात सामंजस्य करार केला. त्यावर एमएएचआरपीचे अध्यक्ष आरिफ सलारू आणि यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली. आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी प्रास्ताविक केले.

प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
(इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे)
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासासाठी ज्ञान आत्मसात करावे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता हीच सरस असून मानवी मेंदूच्या क्षमतांना पर्याय नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला न घाबरता विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने त्याचा सामना करावा, असे आवाहन तंत्रज्ञान अभ्यासक तथा स्तंभलेखक पंकज फणसे यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीबीए-बीसीए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे उपस्थित होते. फणसे म्हणाले, ‘‘मानवी मेंदूची जडणघडणच अशी झालेली असते की आपण काम केल्यानंतर आपल्याला ती निर्मितीचे
समाधान देते. आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाण्याची भीती न बाळगता बदलत्या संदर्भानुसार नवी कौशल्ये आत्मसात करून स्वतःला उभे करण्याबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक असायला हवे.’’ काकडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांचे यश हे विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांचीही जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांसोबत पालकही सजग असतील तर बदलत्या जगाचा आवाका लक्षात घेऊन संधी निर्माण करणे आणि संधीचे सोने करणे विद्यार्थ्यांच्या आवाक्यात येऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चांगले उद्योजक तयार होऊ शकतात.’’ प्रा. तेजस्वी श्रीनिवास यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. योगिता दहिभाते यांनी आभार मानले.
(06250)

‘अविष्कार २०२५’ पोस्टर स्पर्धा
(नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी)
नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव दाभाडे येथे ‘अविष्कार २०२५’ पोस्टर स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख प्रकल्प, तांत्रिक संकल्पना, सामाजिक भान व्यक्त करणारे विषय प्रभावीपणे मांडले. संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. विलास देवतारे, अधिष्ठाता डॉ. सागर शिंदे, डॉ. नितीन धवस आणि डॉ. सतीश मोरे यांचे विशेष योगदान लाभले. विविध अभियांत्रिकी शाखांतील ३० गटांनी सहभाग नोंदविला. विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेसाठी तीन गटांची निवड झाली. यात ग्रीन मील : एक डिजिटल अन्न सुरक्षा सहाय्यक कल्याण मंच, अ‍ॅग्री-कनेक्ट : शेतकरी आणि ग्राहकांमधील अंतर कमी करण्यासाठी प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण : महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाय यांचा समावेश आहे. संस्थास्तरावर एम. के. शेख, डॉ. संजीवकुमार अंगडी, डॉ. अमोल सोनवणे व प्रा. अनिरुद्ध डुबल यांनी आणि विभागीय स्तरावर डॉ. विकास यादव, डॉ. महेश वानखेडे, डॉ. चंद्रकांत कोकणे, डॉ. रेणुका गोंड, डॉ. रोहिणी हंचाटे, डॉ. धनश्री कुलकर्णी व प्रा. विवेक नागरगोजे यांनी परीक्षण केले. विभागीय समन्वयक डॉ. कोटेश्वरराव सीलम, डॉ. अनुज खोंड, प्रा. दीपिका परांजपे, प्रा. रवींद्र गहाणे, प्रा. प्रीतम अहिरे, प्रा. धम्मज्योती धवसे, प्रा. अजय सोनवणे व प्रा. सारिका पाटील होते. डॉ. दिग्विजय पाटील व प्रा. विजय दराडे यांनी संयोजन केले.
(03980)

दांडिया नाइट ः संस्कृतीचा उत्सव
नेहा वडगावे (आयआयसीएमआर)
आयआयसीएमआर महाविद्यालयात आयोजित दांडिया नाइट कार्यक्रमातून भारतीय संस्कृती व परंपरेचा अनुभव आला. अर्को क्लबच्या समन्वयक डॉ. सरिता सॅमसन आणि विद्यार्थी समन्वयक अक्षय वणवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून गरबा आणि दांडिया नृत्याद्वारे सांस्कृतिक परंपरा प्रकट केली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले.
(57515)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT