मोशीत वाहतूक पोलिसाला
मारहाणीमुळे दोघे अटकेत
पिंपरी, ता. ५ : सिग्नल तोडलेल्या मोटारीचे छायाचित्र टिपल्याने चालकाकडून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली. मोशीतील भारतमाता चौकात हा प्रकार घडला.
याप्रकरणी पोलिस हवालदार बाबासाहेब पाखरे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी मनोज चौधरी (रा. स्पाईन रोड) आणि सखाराम मोरे (रा. बनकरवस्ती, मोशी) या दोघांना अटक केली.
फिर्यादी भोसरी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते इतर सहकाऱ्यांसह वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी चिखलीकडून आळंदीकडे जाणाऱ्या मोटारीचा चालक मनोज याने सिग्नल तोडला. त्यामुळे फिर्यादीने त्याचे छायाचित्र काढले. यावरून मोटार रस्त्याच्या मधोमध बंद करून मनोज खाली उतरला. ‘छायाचित्र का काढले’ अशी विचारणा करीत त्याने अरेरावीची भाषा वापरली. त्याने फिर्यादीला धक्काबुक्की केली. त्यात फिर्यादीच्या शर्टची गुंडी तुटली. मनोजने फिर्यादीच्या छातीवर नखाने ओरबाडले.
दुसरा आरोपी सखाराम यानेही फिर्यादीला शिवीगाळ केली. काही राजकीय नेत्यांची नावे सांगून त्याने बघून घेण्याची धमकी दिली. आरोपींनी रस्ता अडविल्याने वाहतूक कोंडी झाली.
------------------------
एअर पिस्तूल बाळगल्याने कारवाई
पिंपरी, ता. ५ : लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एअर पिस्तूल विनापरवाना बाळगल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी कारवाई एकावर केली. देहूगाव बाह्यवळण बायपास रस्त्यावरील कचरा डेपोजवळ ही कारवाई करण्यात आली. यश भुजबळ (रा. देहूगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १० हजार १०० रुपये किमतीचे एअर पिस्तूल आणि २० गोल बेअरिंग पोलिसांनी जप्त केली.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.