पिंपरी-चिंचवड

शालेय जगत

CD

शालेय जगत

मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल
मॉडर्न प्री - प्रायमरी, प्रायमरी इंग्लिश मीडिअम स्कूल, यमुनानगर, निगडी येथे भोंडला उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत आले होते. शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी भोंडल्याची गाणी गायली. कार्यक्रमाचे संयोजन ज्ञाती चौधरी यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन प्रो. डॉ. श्यामकांत देशमुख, यशवंत कुलकर्णी, व्हिजिटर प्रो. डॉ. अतुल फाटक, प्रो. डॉ. शशिकांत ढोले, मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रो. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय
श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय, चिंचवड येथे लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आले. तर, दसऱ्यानिमित्त सरस्वती पूजनाचा कार्यक्रम पार पडला. मुख्याध्यापिका उज्ज्वला चौधरी व लता डेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. विद्या सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली.

श्री फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये खंडेनवमीनिमित्त यंत्रपूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया, विश्वस्त नवीनचंद लुंकड, जयप्रकाश रांका उपस्थित होते. विद्यालयाच्या प्राचार्या सुनीता नवले यांनी प्रस्ताविक केले. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीतील सुजय नाईकनवरे, संकेत लांडगे, कार्तिक सुळे, लखन पवार, प्रतीक गपाट, नृसिंह म्हेत्रे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी घेतला. उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी आभार मानले. पर्यवेक्षक राजेंद्र पितळिया, मनीषा कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षिका सुहासिनी घाडगे यांनी केले.

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय
वडमुखवाडी येथील सयाजीनाथ महाराज विद्यालयात महाभोंडला साजरा करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या. माता पालक रुपाली शिरसाठ व इतर महिला पालकांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून भोंडल्याची सुरुवात करण्यात आली. विद्यालयातील महिला शिक्षकही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, प्रा. अलका पाटील, प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती भोई यांनी, सूत्रसंचालन सोनाली देवकर यांनी केले.

सरस्वती विद्यालय
शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापूजन आयोजित करण्यात आले. याच सोबत महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती व विजयादशमी ही मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. इयत्ता सातवीमधील कुमोद माने व दिव्या सोळंके या विद्यार्थिनी, तसेच वर्गशिक्षिका प्रतिमा काळे यांनी कन्यापूजन, लाल बहादूर शास्त्री जयंती, महात्मा गांधी जयंती व विजयादशमीचे महत्त्व सांगितले. सविता पाटील, कल्पना उभे, प्रशांत चव्हाण, कैलास कोशिरे व चतुर आखाडे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

श्री साईनाथ बालक मंदिर
श्री साईनाथ बालक मंदिर येथे पाटी पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या सचिव निशा बेलसरे यांनी मुलांना पूजेचे महत्त्व, पूजा कशी करावी याबद्दल माहिती सांगितली. संस्थेचे प्रभारी अध्यक्ष प्रा. र. रा. बेलसरे यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक, स्वाती कुलकर्णी, मानसी कुंभार, चैत्राली निबंधे, प्रज्ञा जोशी, योगिता देशपांडे यांनी विद्यार्थ्यांबरोबर शारदादेवी पूजन केले. थावरे गुरुजी यांनी शास्त्रोक्त पूजा सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: रोहित शर्मा, विराट कोहली कर्णधार शुभमन गिलसह ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? प्रवासाच्या तारखा आल्या समोर

Pulse Polio Vaccination : रविवारी ३ लाख बालकांना मिळणार ‘दो बॅुंद जिंदगी के’

Navi Mumbai Airport: दि. बा. पाटलांच्या नावाची घोषणा नाहीच! प्रकल्पग्रस्तांच्या उत्साहावर विरजण

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

Latest Marathi News Live Update : शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी शाळेला ठोकलं टाळं

SCROLL FOR NEXT