पिंपरी-चिंचवड

शिवसेनेशी युतीबाबत राष्ट्रवादीची प्राथमिक चर्चा

CD

पिंपरी, ता. १९ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचा नवा ‘पॅटर्न’ निर्माण होण्याच्‍या हालचाली वाढल्‍या आहेत. त्‍यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्‍या प्रमुख पदाधिकाऱ्यांना युतीसाठी आवाहन केले आहे. युतीबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. तर, दोन्ही पक्षांच्या इच्‍छुकांवर अन्‍याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याची चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्‍याचे पदाधिकारी सांगत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली कार्यकारिणी जाहीर करून पक्षाने संघटना बळकटीकरणावर भर दिला आहे. कार्यकारिणीत १९२ पदाधिकाऱ्यांचा समावेश केल्याने स्थानिक नेतृत्वात उत्साह आहे. ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकाऱ्यांचा संतुलित समन्वय साधण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. तसेच गटबाजी किंवा नाराजी निर्माण होऊ नये, याची विशेष दक्षता घेतली आहे. आता पक्षातील स्‍थानिक नेत्‍यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या टीमकडून प्रभागनिहाय सर्व्हे केला जात आहे. त्‍यामधून बलाढ्य उमेदवारांचा शोध घेऊन निवडणुकीच्‍या रिंगणात उतरविण्याच्‍या हालचाली वाढल्‍या आहेत.
राष्ट्रवादीने उमेदवारी प्रक्रियेला गती दिली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. बहुतांश प्रभागांतून दोन ते तीन उमेदवार पुढे आले आहेत. एका प्रभागातून अनेक इच्छुक असताना अंतिम निवडीवेळी नाराजी उद्भवू नये, यासाठी पक्षाने प्रभागनिहाय सर्व्हेवर भर दिला आहे. स्थानिक पदाधिकारी आणि शहरस्तरीय नेते सर्व्हेत सक्रिय आहेत.

अजित पवार यांचे स्वतंत्र निरिक्षण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियुक्त केलेल्या स्वतंत्र पथकाने प्रत्यक्ष क्षेत्रभेटी सुरू केल्या आहेत. प्रभागातील राजकीय समीकरणे, प्रतिस्पर्धी पक्षाची ताकद, मतदानातील संभाव्य कल आणि विजयाची संधी या सर्व बाबींचे निरीक्षण पथक करत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी सर्वाधिक सक्षम आणि लोकमान्यता मिळवू शकणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात मदत होईल. सर्व्हेचा अहवाल मिळाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि विश्वासार्ह होणार आहे. पक्षांतर्गत मतभेद कमी करत निवडणुकीसाठी एकजूट साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसून येत आहे. नुकतेच दोन प्रभागात आरक्षण बदलले आहे. त्‍यासाठी इच्‍छुकही बदलणार आहेत. यासाठी इच्‍छुकांचा शोध पक्षाकडून घेतला जात आहे.

उमेदवारांची माहिती पाहण्याचे निकष
- किती वर्षांपासून प्रभागात सक्रिय
- जनसंपर्क कसा
- कुटुंबाची सामाजिक कामांची पार्श्वभूमी
- निवडून येण्याचा निकष

सध्या प्रभागनिहाय सर्व्हे सुरू आहे. त्‍यामध्ये उमदेवाराची निवडून येण्याची क्षमता पाहिली जाणार आहे. त्‍यावर सर्वच ज्‍येष्ठ आणि प्रमुख नेते एकत्रित बसून यादी तयार करतील. ही यादी अंतिम मान्‍यतेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे पाठवली जाईल. या बरोबरच महाविकास आघाडीसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेसोबत युतीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे.
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड

सध्या निवडणुकांची कोणतीच तारीख जाहीर झालेली नाही. निवडणूक कधी होईल, हे निश्‍चित नाही. त्‍यामुळे अद्याप कोणताही विचार झालेला नाही. महायुतीमधील देखील कोणत्‍याच पक्षाशी अद्याप चर्चा नाही. निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्‍यानंतर त्‍याबाबत विचार केला जाईल.
- श्रीरंग बारणे, खासदार
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT