पिंपरी-चिंचवड

अप्पर तहसीलच्या नव्‍या जागेला मंजुरी

CD

पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयासाठी टाळगाव-चिखली येथे पाच एकर जागा निश्चित झाली आहे. महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या जागेला मंजुरी दिली आहे. या कार्यालयासाठी कायमस्वरुपी जागेची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. दरम्यान, याबाबत अधिक प्रक्रियेची प्रतीक्षा आहे, असे अप्‍पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.
नव्‍या जागेअभावी सध्या निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारी भाडेतत्वावरून हे कार्यालय सुरू आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे कामकाजात अडचणी येत आहेत. दररोज शेकडो नागरिक रहिवासी, उत्पन्नासह विविध दाखल्यांसाठी येथे येतात. कार्यालयात सध्या फक्त आठ लिपिक, एक अव्वल कारकून, नायब तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार यांच्यामार्फत कामकाज पार पडते. जागेअभावी दस्तावेज व साहित्य ठेवण्याची अडचण आहे. नव्या जागेची मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू न झाल्याने कार्यालय जुन्याच जागेत चालवावे लागत आहे. लवकरच नवीन जागेबाबत पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death: आता ‘दादा’ कुणाला म्हणायचं? अजित पवारांची संपूर्ण कारकीर्द… राजकीय प्रवासाचा थोडक्यात आढावा

Ajit Pawar Plane Crash : विमान धावपट्टीवर आलं अन् अचानक... अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवार यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते - अमित शाह

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांसह विमान प्रवास करणारे विदीप जाधव, पिंकी माळी कोण? किती जण होते विमानात?

आग, राखेचा ढिगारा, विमानाचे तुकडे, अजित पवारांच्या विमान अपघाताचे फोटो समोर

SCROLL FOR NEXT