पदपथाची दुरवस्था
चापेकर चौकातील पदपथावर राडारोडा, टाकाऊ साहित्य पडून आहे. तसेच पदपथावर अनेक खड्डे असून फरश्या तुटल्या आहेत. मंडई, पोलिस ठाणे, दवाखाने आणि बस स्थानक असलेल्या परिसरातील पदपथाची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना चालण्यास अडचण होत आहे. परिणामी नागरिक रस्त्यावर उतरून चालतात, त्यामुळे अपघात होत आहेत. वारंवार तक्रार करून देखील पालिका पदपथाची दुरुस्ती आणि स्वच्छता करत नाही.
-दिलीप बाफना, चिंचवड
PNE25V65334
जिजाऊ उद्यानातील फरश्या उखडल्या
चिंचवडगावातील जिजाऊ उद्यान मधील फरश्या उखडलेल्या अवस्थेत आहेत. सकाळी येथे अनेक ज्येष्ठ नागरिक चालायला येतात त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ दुरुस्ती करावी.
धनंजय विपट, चिंचवडगाव
PNE25V65335
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांना समस्या
एसकेएफ कंपनी कडून चापेकर चौकाकडे जाणारा रस्त्याच्या कडेला मागील अनेक वर्षांपासून खड्डे पडले आहेत, त्यात सतत पाणी साचून राहते. परिणामी रस्त्याच्या मधोमध बस पार्क केल्या जातात. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे, तसेच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
- संजीव कालेकर
PNE25V65336
गावठाण जलतरण तलाव परिसरात भटक्या कुत्र्यांची भीती
चिंचवड गावठाणातील वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव येथे बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याजवळ भटक्या कुत्र्यांनी ठाण मांडले आहे. याठिकाणी खुल्या व्यायाम शाळेचे साहित्य आहे तसेच फिरण्यासाठी जॉगिंग पार्क आहे, परतू तिथे नागरिक व्यायाम करीत नाही. कारण ही कुत्री माणसे पाहताच जोरजोरात भुंकण्यास सुरवात करतात तसेच अंगावर धावून येतात. तरी प्रशासनाने तातडीने या श्वानांचा बंदोबस्त करावा.
-प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V65333
पालिका क्षेत्रातील बेवारस वाहने हटवा
महापालिका हद्दीतील पदपथ, रस्ते, उड्डाण पूल येथे अवैध्यरित्या सोडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्वच्छता व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या परिसरात सोडून दिलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याकरिता कारवाई करण्यात येणार आहे. असेच एक वाहन के. एस. बी. चौकातील रस्त दुभाजकात मागील काही दिवसांपासून एकाच ठिकाणी उभे आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत अतिक्रमण होत आहे. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने अशा वाहनांची विल्हेवाट लावावी.
- बी. एस. पाटील, संभाजीनगर ,चिंचवड
PNE25V65331