पिंपरी-चिंचवड

अनधिकृत केबल काढा, अन्यथा कारवाई

CD

पिंपरी, ता. ५ : महापालिकेने उभारलेल्या विद्युत खांबांचा वापर केबल कंपन्यांकडून अनधिकृतपणे केला जात आहे. ‘‘येत्या सात दिवसांत या केबल्स स्वतः काढून न घेतल्यास थेट कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा महापालिकेने या कंपन्यांना दिला आहे.
शहरात ठिकठिकाणी अनधिकृत केबलचे जाळे पसरल्याबाबत ‘सकाळ’ने सचित्र वृत्त दिले होते. प्रामुख्याने या केबल कंपन्यांनी महापालिकेच्या विद्युत खांबाचा वापर केल्याचे बातमीत मांडले होते. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, रावेत, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी आणि पिंपरी अशा सर्वच उपनगरांमध्ये इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या काही कंपन्यांनी विद्युत खांबांवरून अनधिकृत केबल टाकल्या आहेत. गृहनिर्माण संस्था, वाणिज्य वसाहती, शाळा व रुग्णालयांच्या इमारतींवरून थेट या केबल ओढल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे, तर काही ठिकाणी ‘बीआरटी’ बस थांब्यांचा आधार घेऊन या वायर रस्त्यांवरून सोसायट्यांमध्ये नेल्या आहेत. याबाबतची स्थिती वृत्तातून मांडण्यात आली होती.
दरम्यान, ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर’अंतर्गत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा जानेवारी-२०२६ मध्ये पिंपरी चिंचवड शहरातही आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत खांबांवर टाकलेल्या अनधिकृत केबल्स स्पर्धेस अडथळा ठरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने केबल कंपन्यांना त्वरित केबल्स हटविण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाने जाहीर सूचना दिली आहे. स्पर्धेचा मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित राहवा, यासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत.

या मार्गांवर होणार सायकल स्पर्धा
मार्ग क्रमांक १ : राजीव गांधी उड्डाणपूल- सांगवी- बास्केट ब्रिज, डी. वाय. पाटील कॉलेज, भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, थरमॅक्स चौक, टेल्को रस्ता, इंद्रायणीनगर कॉर्नर, केएसबी चौक, आयुक्त बंगला मोरवाडी, ऑटो क्लस्टर, एम्पायर इस्टेट ब्रिज, काळेवाडी फाटामार्गे औंध, पुणे मनपा

मार्ग क्रमांक २ : विनोदे वस्ती चौक, हिंजवडी, भूमकर चौक, डांगे चौक, बिर्ला रुग्णालय मार्ग, चिंचवड चौक, वाल्हेकरवाडी व भोंडवे कॉर्नरमार्गे डी. वाय. पाटील कॉलेजपर्यंत.

‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर’ स्पर्धेच्या मार्गावरील अनधिकृत केबल संबंधित कंपन्यांनी काढून घ्याव्यात. यासाठी सात दिवसांत मुदत देण्यात आली आहे. केबल तशाच दिसल्या, तर दंडात्मक कारवाई करुन त्या जप्त केल्या जातील.
- माणिक चव्हाण, सह शहर अभियंता, विद्युत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT