पिंपरी-चिंचवड

स्वच्छ, हरित विद्यालय मूल्यमापन होणार

CD

पिंपरी, ता. ७ ः शाळांमध्ये स्वच्छता, हिरवळ आणि सर्वसमावेशक आनंददायक शालेय वातावरण नियमितपणे टिकवण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे. यासाठी शालेय शिक्षणातून स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना सहभागी होण्याच्या सूचना राज्य शिक्षण परिषदेने केल्या आहेत.

स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन २०२५-२६ हा उपक्रम पूर्वीच्या स्वच्छ विद्यालय पुरस्काराच्या धर्तीवर व्यापक व सार्वत्रिक स्वरूपात सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय, खासगी अनुदानित, खासगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि शाळांमध्ये स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी व पर्यावरण संरक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींची सुलभ कार्यपद्धतीद्वारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शाळा सहभागी होणार असल्याने मूल्यांकनासाठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होणार आहे. एक ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान शाळांना ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करण्यास सांगितले आहे. एक ते ३१ ऑक्टोबर जिल्हास्तरावर शाळांची निवड करण्याच्या सूचना केल्या होत्या.

असे होणार मूल्यमापन
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकनासाठी सहा प्रमुख विषयांवर आधारित ६० प्रश्नांद्वारे स्वयंमूल्यांकन होईल. पाणी, स्वच्छतागृहे, साबणाने हात धुणे, ऑपरेशन आणि देखभाल, वर्तन बदल आणि क्षमता बांधणी आणि मिशन लाइफ उपक्रम या घटकांचे मूल्यमापन होणार आहे. त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शाळेत असलेल्या परसबागेवरही आधारित मूल्यांकन होणार आहे.

‘‘शाळांमध्ये हिरव्या पद्धतींवर भर देते, स्वच्छ वातावरणाला चालना देते आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जागरूकता निर्माण करते. यामध्ये सर्व शाळा सहभागी होणार असल्याने मूल्यांकनासाठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होणार आहे. ’’
- महेंद्र गणपुले, माजी प्रवक्ता मुख्याध्यापक संघ

असे आहे वेळापत्रक
- राज्यस्तरासाठी शाळांचे नामांकन करणे ः ७ नोव्हेंबर
- राज्यस्तरावर शाळांची निवड करणे ः ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर
- राष्ट्रीय स्तरासाठी शाळांचे नामांकन करणे ः १४ डिसेंबर
- राष्ट्रीय स्तरावर शाळांची निवड करण्यासाठी फेरतपासणी ः १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : पुणे व मुंबईतील जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा - हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT