पिंपरी-चिंचवड

‘सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्...’

CD

पिंपरी, ता. ७ : ‘वंदे मातरम्’ या गीताचा यंदा १५० वर्षे अर्थात सार्ध शताब्दी महोत्सव सुरू आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले हे गीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरले. या राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्‍ये त्याचे सामुदायिक गायन घेण्यात आले. तसेच या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल : शाळेमध्ये वंदे मातरम् गीताचे सामुदायिक गायन करण्यात आले. संगीत विशारद साधना भालेकर यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले. याप्रसंगी प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले व शिक्षक प्रतिनिधी अलका बारगजे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात वंदे मातरम् गायन करण्यात आले. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मुख्य संयोजनात इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीतील सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वंदे मातरम् गीत गायले. क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शबाना शेख, डॉ. अभय पोद्दार आदींनी नियोजन केले.

मॉडर्न हायस्कूल : निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणात विविध कार्यक्रम घेण्यात आले. खंडू खेडकर यांनी विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’ गीताचा इतिहास, त्यामागील राष्ट्रप्रेमाची भावना आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी सर्वेश कस्तुरे याने अधिक माहिती दिली. कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांची सादरीकरणे, माहितीमूलक व्याख्याने आणि वाचन-प्रात्यक्षिके घेण्यात आली. निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळासमिती अध्यक्ष प्रा. मानसिंग साळुंखे,व्हिजीटर प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम शाळा : शाळेत विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शिक्षिका वैभवी फडके यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाचे महत्त्व सांगितले. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकडून ‘वंदे मातरम्’ शब्दांची प्रतिकृती साकारण्यात आली. शाला समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका सविता बिराजदार आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT