पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

साईबाबा मंदिराजवळील शेड धोकादायक अवस्थेत
चिंचवड येथील केशवनगर परिसरात साईबाबा मंदिराजवळील शेड मोडकळीस आली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन शेडची दुरुस्ती करावी.
-सां. रा. वाठारकर, चिंचवड
NE25V66230

संभाजी चौक-बिजलीनगर परिसरात वाहतूक कोंडी नित्याची
प्राधिकरणातील संभाजी चौक ते बिजलीनगर पूल दरम्यान रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. पण या ठिकाणी काही नागरिक वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी होते. तसेच विरुद्ध दिशेने वाहने येत असल्याने अपघाताची शक्यता आहे. या मार्गावर शाळा असल्याने येथे कोंडी नेहमीच असते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे.
-एक नागरिक, प्राधिकरण
PNE25V66229


यशवंतनगर परिसरात असुरक्षित खड्डा
तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरातील शंकर मंदिर आणि टपाल कार्यालयासमोर खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही पद्धतीचे सूचना फलक न लावता येथे हा खड्डा खोदण्यात आला आहे.
-एक नागरिक, तळेगाव दाभाडे
E25V66228


धोकादायक पद्धतीने कचऱ्याची वाहतूक
निगडी-भोसरी रस्त्यावर कचऱ्याची वाहतूक धोकादायक पद्धतीने होत असल्याची तक्रार वारंवार केली आहे. परंतु आरोग्य विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे धोकादायक पद्धतीने कचरा संकलन करणाऱ्या विना नंबरच्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाहने येथे रस्त्यावर धोकादायकपणे कचऱ्याची वाहतूक करतात.
-बी. एस. पाटील, संभाजीनगर
PNE25V66231

काळाखडक वाकड मार्ग खड्डेमय
काळा खडक येथील चौधरी पार्क परिसरातील वाकड मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी अर्धवट डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहत आहे, परिणामी परिसरात कचऱ्याची दुर्गंधी वाढली आहे. पिंपरी चिंचवड प्रभाग ‘ड’ च्या स्थापत्य अभियंता यांनी याची दखल घेऊन येथील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी.
-विवेक म्हसकर, वाकड
PNE25V66234

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT