पिंपरी, ता. ८ ः खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी (ता. ९) २७ व्या राज्यव्यापी वधु-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरवात होणार आहे. अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, मंडळाचे संस्थापक एस. के. माळी, ज्येष्ठ सल्लागार पी. के. महाजन, नाना माळी, भीमराव माळी, उद्धव महाजन, किशोर वाघ, शिवाजी माळी आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नकुल महाजन यांनी दिली.