पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

विकासनगर रस्ता रुंदीकरण ?
किवळे- विकासनगर परिसर १९९७ मध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट झाला. प्रचंड लोकवस्ती, रहदारी, व्यापार वाढला. मात्र, रस्ता अरुंद राहिला. अतिक्रमणे वाढून उलट आणखी लहान झाला. रस्ता ओलांडणे म्हणजे दिव्यच. लहान- सहान अपघात नित्याचेच. आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी भरपूर आश्वासने दिली. परंतु रुंदीकरण मात्र होत नाही. निधी मंजूर केला आहे, निविदा निघाल्या आहेत, एवढेच काय, भूमिपूजन, नारळ फोडून ६ महिने झाले. तरी झारीतील शुक्राचार्य दूर होत नाही. नागरिक रस्त्याची दुर्दशा पाहून व्यथित आहेत. संबंधित आजी-माजी, भावी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का?
- रवींद्र कदम, विकासनगर
PNE25V67066

पदपथावरील कचरा, राडारोडा हटवा
चिंचवडगावातील चापेकर चौक भाजी मंडईलगत पदपथावर अनेक खड्डे पडले आहेत. फरश्या निखळल्या आहेत. राडारोडा, घाण, चिखल, कचरा, टाकाऊ साहित्य पडून आहेत. पदपथाची अतिशय दुरवस्था झाली आहेत. अतिशय गर्दी, शाळा,मंडई, पोलिस ठाणे, रुग्णालय असलेला हा परिसर आहे. परंतु पदपथाची दुरवस्था असल्याने त्यावर नागरिकांना चालता येत नाहीत. नाइलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागते. अपघात होत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस वारंवार कळवून सुद्धा पदपथाची दुरुस्ती केली जात नाही. नागरिक त्रस्त आहेत. तरी पदपथाची दर्जेदार दुरुस्ती करावी. राडारोडा, कचरा ,घाण, टाकाऊ साहित्य हटवून पदपथ नागरिकांना चालण्यास उपलब्ध करून देण्यात यावेत.
- दिलीप बाफना, चिंचवड
PNE25V67068


बस थांबा नक्की कोणता ?
चिंचवडगाव ते काळेवाडी मार्गावरून जाताना पीएमपी बसथांब्याचा कल्याण प्रतिष्ठान फलक व्याकरणदृष्ट्या चुकीचा आहे. तसेच या मार्गावरून जाताना तांब्याचा राज पार्क म्हणून ओळखतात. तरी हा थांबा नक्की कोणत्या नावाचा आहे ? त्याप्रमाणे दुरुस्ती करण्यात यावी तसेच पालखीच्या फलकावर प्रदूषण, पर्यावरण यातील न नळाचा असतो. त्यामध्ये पण दुरुस्ती व्हावी, असे सुचवावेसे वाटते.
- रमेश देव, चिंचवड
PNE25V67065

फांद्याची छाटणीत चालढकल
सध्या नवी सांगवीमध्ये रस्त्यावरच्या झाडाच्या फांद्या खूप वाढून सीसीटीव्ही झाकले जात आहेत. वादळ आले की झाड तुटून अपघाताची शक्यता वाढली आहे. झाडांना फुले आली आहेत. आमची सोसायटी व्ही.एस. रेसिडेन्सी, काटे पूरम चौक, गेल्या २ महिन्यांपासून उद्यान विभागाला अर्ज देऊन पाठपुरावा करत आहे. साधे झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी यांना २ ते ३ महिने लागतात. त्या कामासाठी लोकांना नगरसेवकाला भेटावे लागते. हे लाजीरवाणे आहे. उद्यान विभाग खरंच एवढा कामाने व्यस्त आहे ? चुकून आलेच फांद्या तोडायला, तरी ते लोकं चहा-पाण्याच्या नावाने पैसे मागतात.
- महेश देवपूरकर, व्ही. एस. रेसिडेन्सी, नवी सांगवी
PNE25V67067

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!

Ranji Trophy 4th Round: विदर्भाचा दणदणीत विजय; तर महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या मयंक अगरवालचं शतक अन्...

Latest Marathi Breaking News : नीलेश घायवळ टोळीला आणखी एक दणका, आता तिसरा 'मकोका' लावला

Mumbai Local: लोकल वाहतुकीला मिळणार ‘ग्रीन कॉरिडॉर’! 'या' मार्गादरम्यानचे १० रेल्वे फाटक होणार बंद

Ajit Pawar: रुपाली ठोंबरे यांना दोन्ही शिवसेनेची ऑफर; उद्या घेणार अजित पवारांची भेट, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT