सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी मंगळवारी (ता. ११) चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात माजी नगरसेवक आणि इच्छुकांसह समर्थकांचाही समावेश होता. आरक्षण जाहीर होताच कुठे ‘हुर्रे’, तर कुठे ‘अरेरे’ अशा प्रतिक्रिया उमटल्या.
प्रेक्षागृहात टाळ्यांचा आवाज घुमत असताना आरक्षण मनासारखे पडलेले खूष, तर संधी आताच हुकलेले नाखूष असे संमिश्र वातावरण दिसले. काहींनी तर तेथेच ‘त्वरित कामाला लागा’ अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. माजी नगरसेवकांसह इच्छुकांची निवडणूक लढविण्याची दिशा मंगळवारी निश्चित झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका निवडणूक ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांच्या हरकती व सूचना स्वीकारून प्रभाग रचना अंतिम केली. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी-इतर मागासवर्गीय) यांसाठी आणि या संवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया पूर्ण झाली. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, स्मार्ट सिटीचे साहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्यासह महापालिका मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहआयुक्त मनोज लोणकर, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी, नगरसचिव मुकेश कोळप, सहशहर अभियंता अनिल भालसाकळे, बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे आदींनी प्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीची माहिती दिली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रभाग क्रमांकांच्या चिठ्ठ्या काढून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
उत्साह आणि नाराजीचे चित्र
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोडतीदरम्यान प्रेक्षागृहात उत्साह, तणाव, आनंद आणि नाराजीचे मिश्र वातावरण पाहायला मिळाले. सोडतीची प्रक्रिया सुरू होताच प्रत्येक प्रवर्गातील आरक्षण जाहीर होण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. इच्छुकांच्या चेहऱ्यावर धाकधूक स्पष्ट दिसत होती. अपेक्षित आरक्षण निघाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना हस्तांदोलन करत आनंद साजरा केला. आरक्षण न लागल्याने काहींनी नाराजी व्यक्त करीत बाहेरचा मार्ग धरला. सोडतीदरम्यान पारदर्शकतेसाठी चिठ्ठ्या मुलांच्या हातून काढण्यात आल्या. या वेळी कोणताही परिणाम होऊ नये म्हणून चिठ्ठ्यांकडे न पाहता त्या काढण्याची सूचना होती. प्रेक्षागृहातील मुख्य प्रवेशद्वार नागरिकांसाठी बंद होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. आत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत होती.
मोठ्या स्क्रीनची सुविधा
गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन प्रेक्षागृहाबाहेर नागरिकांसाठी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती. बसण्यासाठी खुर्च्याही ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आरक्षण सोडत प्रक्रिया पाहता आली.
चार टप्प्यात प्रक्रिया
---
या जागांची आरक्षणे जाहीर
- एससी प्रवर्ग महिला राखीव
- एसटी प्रवर्ग महिला राखीव
- ओबीसी आणि त्यातील महिला राखीव
- सर्वसाधारण (खुला) महिला
---
असे काढले आरक्षण (सर्व ३२ प्रभाग)
- ‘अ’ जागा लोकसंख्येच्या प्रमाणात २० जागा एससी आणि १२ जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होत्या. त्यातून संबंधित संवर्गातील महिलांसाठी अनुक्रमे १० व ओबीसी सर्व १२ जागा आरक्षित झाल्या.
- ‘ब’ जागांमधील १७ जागा ओबीसींसाठी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात तीन जागा एसटीसाठी राखीव होत्या. त्यातील एसटी महिलांसाठी दोन जागा राखीव झाल्या. तर, ‘अ’मधील १२ आणि ‘ब’मधील १७ अशा २९ ओबीसी जागांमधून ओबीसी महिलांसाठी १७ जागांचे आरक्षण काढण्यात आले
- एससी, एसटी, ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यानंतर ज्या प्रभागातील तीन जागा खुल्या आहेत, अशा प्रभागांतील १० ‘ब’ जागा आणि ज्या प्रभागात दोन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, त्या सोडून ‘क’ जागांमधील २४ अशा ३४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केल्या.
- सर्वसाधारण ७१ जागांपैकी ३५ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करायच्या होत्या. त्यामुळे ‘ब’ व ‘क’ मिळून ३४ जागा आरक्षित झाल्यानंतर एक ‘ड’ जागा प्रभाग ३० मधून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली.
---
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५-२६
एससी, एसटी, ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण
प्रभाग क्रमांक / प्रभागाचे नाव / अ / ब / क / ड
१ / चिखली पाटीलनगर म्हेत्रेवस्ती / ओबीसी / महिला सर्वसाधारण / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२ / जाधववाडी बोऱ्हाडेवाडी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण / सर्वसाधारण
३ / मोशी डुडुळगाव चऱ्होली / महिला एससी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
४ / दिघी बोपखेल / महिला एससी / एसटी / महिला ओबीसी / सर्वसाधारण
५ / रामनगर-सावंतनगर गवळीनगर / महिला ओबीसी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
६ / धावडेवस्ती-सद्गुरूनगर / महिला ओबीसी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
७ / भोसरी गावठाण / ओबीसी / महिला सर्वसाधारण / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
८ / इंद्रायणीनगर-बालाजीनगर / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
९ / नेहरूनगर-मासुळकर-खराळवाडी / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१० / मोरवाडी-शाहूनगर-विद्यानगर / महिला एससी / महिला ओबीसी / सर्वसाधारण / सर्वसाधारण
११ / घरकूल-पूर्णानगर-कृष्णानगर / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१२ / तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर / ओबीसी / महिला सर्वसाधारण / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१३ / निगडी-गावठाण-यमुनानगर / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१४ / मोहननगर-काळभोरनगर / ओबीसी / महिला सर्वसाधारण / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१५ / आकुर्डीगावठाण-प्राधिकरण / ओबीसी / महिला सर्वसाधारण / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१६ / रावेत-किवळे-मामुर्डी / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१७ / दळवीनगर-वाल्हेकरवाडी / महिला एससी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
१८ / चिंचवडगाव-तानाजीनगर / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण / सर्वसाधारण
१९ / विजयनगर-भाटनगर-पिंपरी कॅम्प / महिला एससी / महिला ओबीसी / सर्वसाधारण / सर्वसाधारण
२० / वल्लभनगर-संत तुकारामनगर / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२१ / पिंपरीगाव-मिलिंदनगर / महिला एससी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२२ / काळेवाडी-विजयनगर / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण / सर्वसाधारण
२३ / थेरगाव गावठाण-पवारनगर/ महिला एससी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२४ / दत्तनगर-बेलठिकानगर / ओबीसी / महिला सर्वसाधारण / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२५ / पुनावळे-ताथवडे-वाकड / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२६ / पिंपळे निलख-विशालनगर / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२७ / रहाटणी-श्रीनगर-तापकीरनगर / एससी / महिला ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२८ / पिंपळे सौदागर-रामनगर / ओबीसी / महिला सर्वसाधारण / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
२९ / पिंपळे गुरव-वैदुवस्ती / महिला एससी / महिला एसटी / ओबीसी / सर्वसाधारण
३० / कासारवाडी-फुगेवाडी-दापोडी / एससी / महिला एसटी / ओबीसी / सर्वसाधारण महिला
३१ / नवी सांगवी / महिला एससी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
३२ / जुनी सांगवी / महिला एससी / ओबीसी / महिला सर्वसाधारण / सर्वसाधारण
(ओबीसी ः नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण ः खुला)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.