पिंपरी-चिंचवड

माजी नगरसेवकांपुढे तडजोडीचे ‘गणित’

CD

पिंपरी, ता. ११ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ११) आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात कासारवाडी-फुगेवाडी-दापोडी प्रभागक्रमांक ३० मधील अ, ब, क आणि ड या चारही जागा वेगवेगळ्या संवर्गासाठी आरक्षित झाल्या. त्यामुळे सर्वसाधारण अर्थात खुल्या गटातील पुरुषांना येथील निवडणुकीचे दरवाजे बंद झाले आहेत. अन्य ३२ पैकी ३१ प्रभागांमधील ‘ड’ क्रमांकाच्या जागा खुल्या आहेत. शिवाय, साधारण १० प्रभागांमध्ये २०१७-२०२२ या कालावधीतील २० माजी नगरसेवकांना तडजोड करावी लागणार आहे. काहींना घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार असल्याचे चित्र आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गासाठीचे आरक्षण प्रभाग तीसमध्ये निश्चित झाले होते. कारण, या प्रभागातील एससी आणि एसटी या दोन्ही संवर्गाची लोकसंख्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे निवडणूक अधिनियमानुसार, ‘अ’ जागा एससी संवर्गासाठी आणि ‘ब’ जागा एसटी संवर्गासाठी आरक्षित झाली होती. त्यातील महिलांसाठीच्या आरक्षणात ‘ब’ जागा एसटी संवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली. प्रभागातील ‘क’ जागा २७ टक्के आरक्षणानुसार ओबीसींसाठी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आरक्षित झाली. एससी, एसटी, ओबीसी संवर्ग आणि त्यांतील महिलांसाठी जागा आरक्षित झाल्यानंतर खुल्या (सर्वसाधारण) गटातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यांत प्रभाग ३० मधील ‘ड’ जागा आरक्षित झाली. त्यामुळे प्रभागात ‘अ’ जागा एससी, ‘ब’ जागा एसटी महिला, ‘क’ जागा ओबीसी आणि ‘ड’ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातून खुल्या प्रवर्गातील पुरुषांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे माजी नगरसेवक रोहित ऊर्फ अप्पा काटे, संजय ऊर्फ नाना काटे, राजेंद्र काटे यांना यांना तडजोड करून स्वतःऐवजी घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागेल.

तडजोडीने साधावे लागणार गणित
एससी, एसटी, ओबीसी आणि महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रभागातून कोणत्या जागेवर लढावे याचे गणित स्पष्ट झाले. मात्र, २०१७ ते २०२२ या पंचवार्षिकमध्ये निवडून आलेल्यांपैकी काहींना या आरक्षणाचा फटका बसला आहे. नगरसदस्यपद (नगरसेवक किंवा नगरसेविका) आपल्या घरातच राहण्यासाठी त्यांना प्रतिस्पर्ध्यांशी तडजोड करून निवडणूक लढण्याचे गणित साधावे लागणार आहे. असे प्रभाग व जागा पुढीलप्रमाणे...
- प्रभाग चारमध्ये तीन जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यात एक एससी महिला, एक एसटी, एक ओबीसी महिला आरक्षणाचा समावेश आहे. त्यामुळे माजी नगरसेवक विकास डोळस यांना घरातील महिलेला प्राधान्य द्यावे लागेल.
- प्रभाग आठमध्ये एक जागा एससी, एक ओबीसी महिला, एक सर्वसाधारण महिला अशा तीन जागा आरक्षित झाल्या आहेत. गेल्या वेळच्या दोन नगरसेवकांपैकी विलास मडिगेरी किंवा विक्रांत लांडे यांना तडजोड करून महिलेला प्राधान्य द्यावे लागेल.
- प्रभाग १२ मध्ये एक जागा ओबीसी आणि दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे गतवेळचे विजेते पंकज भालेकर व प्रवीण भालेकर यांना तडजोड करून घरातील महिलेला उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी लागेल.
- प्रभाग २० मध्ये एक जागा एससी, एक जागा ओबीसी महिला आणि एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक योगेश बहल आणि श्याम लांडे यांना तडजोड करावी लागणार आहे व घरातील महिलेला उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी लागेल.
- प्रभाग २४ मधील म्हातोबानगर प्रभाग २५ ला जोडल्यामुळे गेल्या वेळचे एससी आरक्षण बदलून प्रभाग २४ मधील दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आणि एक जागा ओबीसींसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक सचिन भोसले यांना खुल्या गटातून लढावे लागेल.
- प्रभाग २५ आणि प्रभाग २६ मध्ये अनुक्रमे माजी नगरसेवक राहुल कलाटे व मयूर कलाटे आणि संदीप कस्पटे यांना तडजोड करून
स्वतःऐवजी घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागेल.
- प्रभाग २९ मध्ये प्रत्येकी एक जागा एससी व एसटी महिलेसाठी आणि एक जागा ओबीसीसाठी राखीव झाल्याने माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांना खुल्या जागेवरून निवडणूक लढवावी लागेल किंवा घरातील महिलेला निवडणूक लढवावी लागेल.
- प्रभाग ३१ व ३२ मध्ये समान परिस्थिती आहे. प्रत्येकी एक जागा एससी महिलेसाठी, प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आणि प्रत्येकी एक जागा ओबीसींसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे एससी संवर्गातील लढतीसाठी माजी नगरसेवक अनुक्रमे अंबरनाथ कांबळे व संतोष कांबळे यांच्या घरातील महिलांना निवडणूक लढवावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

IND vs SA: टीम इंडियाला धक्का! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टार फलंदाज खेळणार नाही, कारण...

Pune Traffic: कार्तिक यात्रेनिमित्त पुण्यात उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल; पालखीमार्ग टाळण्याचं आवाहन

Pimparkhed News : बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांसाठी वनमंत्री गणेश नाईक उद्या भेटीस येणार !

Latest Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT