पिंपरी-चिंचवड

लर्निंग लायसन्सवरील नावात बदल करण्याचा पर्याय बंद

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) काढण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. पूर्वी आरटीओ अधिकाऱ्यांना ॲडमिन लॉगिनवरुन लर्निंग लायसन्सवरील नावात बदल करण्याचा पर्याय होता. आता एनआयसीने पर्यायच बंद केल्याने नावातील चुक दुरुस्त करण्याची संधीच गेली. त्यामुळे नागरिकांना पुन्हा लर्निंग लायसन्स काढावे लागते किंवा पहिल्यापासून ऑफलाइन प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड पडतो.
पूर्वी नागरिकांना आरटीओ कार्यालयाशी संबंधित प्रत्येक कामासाठी चकरा माराव्या लागायच्या. आता शासनाने अनेक सुविधा ऑनलाइन दिल्या आहेत. घरबसल्या काम होऊ शकते. यात लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलणे यांसह इतर अनेक सुविधा ऑनलाइन दिल्या जातात. परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परिक्षा (टेस्ट) सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, गेल्या महिन्यात तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा बंद झाली. कार्यालयात येऊन परिक्षा देणे बंधनकारक झाले आहे.
लर्निंग लायसन्सचा ऑनलाइन अर्ज भरतानाच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधार नंबर टाकून ऑनलाइन अर्ज करताना आधारवरील नाव आहे तसेच लर्निंग लायसन्सवर येते. आधारवरील नावात चूक असेल तर लर्निंग लायसन्सचा ऑनलाइन अर्ज करताना त्यात बदल करण्याचा पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात येऊन ऑफलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज करून लर्निंग लायसन्स काढले तरी पक्के लायसन्स काढण्यासाठी अर्ज करताना लर्निंग लायसन्सवरील नावात बदल करता येत नाही.
बहुतांश जणांच्या आधारकार्डवर पहिल्या नावाच्या जागी पूर्ण नाव आहे. वडिलांचे नाव ही जागा रिकामी असल्याने पक्के लायसन्स काढता येत नाही. अधिकाऱ्यांच्या पातळीवर दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना फटका बसतो.
---------
किती आहे शुल्क (रुपयांत)
फक्त दुचाकी किंवा चारचाकीसाठी
जुन्या पक्क्या लायसन्सची मुदत संपल्यास लर्निंग लायसन्ससाठी - १५१
पहिल्यांदा लर्निंग लायसन्स - २०१
-----------
दुचाकी आणि चारचाकीसाठी
पहिल्यांदा लर्निंग लायसन्स - ३५०
--------------
माझ्या आधारवर नावाच्या ठिकाणी माझ्या पतीचे आणि आडनाव आहे. पतीच्या नावाच्या ठिकाणी रिकामी जागा आहे. लर्निंग लायसन्स काढताना आधारवरचे नाव आहे तसे छापून आले. आता पक्के लायसन्स काढताना पतीच्या नावाच्या ठिकाणी रिकामी जागा असल्याने अर्ज स्वीकारला जात नाही. अर्जातील नावात बदल करण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
- विद्या जगताप, नागरिक
---
आधारचा डेटा एनआयसीच्या सर्व्हरशी जोडला आहे. त्यामुळे आधार नंबर टाकला की आधारवर आहे तेच नाव स्वयंचलित पद्धतीने लर्निंग लायसन्सवर येते. ज्यांचे आधारवरील नाव चुकले आहे त्यांनी ते दुरुस्त करून घ्यावे किंवा ऑफलाईन अर्ज करून लर्निंग लायसन्स काढावे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT