पिंपरी-चिंचवड

महिला सक्षमतेसाठी ‘सखी आंगण’ची निर्मिती

CD

पिंपरी, ता. १२ ः महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत महापालिकेने आकुर्डीत उभारलेल्या खाद्यपदार्थ केंद्रातील ४९ गाळ्यांचे महिला बचत गटांना वाटपासाठी भारतातील पहिला ई-लिलाव घेतला होता. या केंद्राला ‘सखी आंगण’ नाव दिले असून, त्यांचे प्रतिकचिन्ह (लोगो) निश्चित केला आहे. या केंद्राचे संचालन पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांमार्फत केले जाणार आहे.
महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्री केंद्र महापालिकेने उभारले आहे. या आधुनिक इमारतीतील सर्व ४९ गाळे महिला बचत गटांना खाद्यपदार्थ विक्री व व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी भाडेकराराने ई-लिलावाद्वारे गाळे दिले जाणार आहेत. प्रतिगाळा १५ हजार १०० ते ३२ हजार रुपयांपर्यंत लिलाव दर नोंदविले.

असे आहे ४९ गाळ्यांचे वाटप
तृतीयपंथ गट ः १
कोविड योद्धा महिला गट ः १
आदिवासी गट ः २
दिव्यांग महिला बचत गट ः २
दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत गट ः ३
पीसीएमसी सक्षम अंतर्गत नोंदणीकृत गट ः ४०

असे घडले केंद्र
- खाद्यपदार्थ केंद्राच्या सुशोभीकरण आणि ब्रँडिंगसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष हॅकेथॉन स्पर्धा
- डिझायनिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कल्पकतेतून इमारतीचे आकर्षक सुशोभीकरण
- खाद्यपदार्थ केंद्राला ‘सखी आंगण’ हे मराठी नाव दिले आहे
- पिंपरी चिंचवड शहराच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणारे तसेच महिलांसाठी कार्य केलेल्या समाजसुधारकांची माहिती देणारे फलक

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘सखी आंगण’ उपक्रम मोठी भूमिका बजावणार आहे. महिला बचत गटांना व्यवसायाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत करण्यात आला आहे. हा उपक्रम महिलांच्या विकासाच्या प्रवासात परिवर्तन घडवणारा ठरेल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

आकुर्डीतील खाद्यपदार्थ केंद्राद्वारे महिलांना खाद्यपदार्थ, हस्तकला, घरगुती वस्तू आणि वस्त्रनिर्मिती यासारख्या विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यातून महिलांना स्थिर उत्पन्नाचे व्यासपीठ मिळून शहराच्या अर्थचक्रात त्यांचा सहभाग वाढेल. दरमहा दहा लाखांहून अधिक उलाढाल अपेक्षित असून, महिलांचे कौशल्य, व्यवस्थापन क्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच हातभार लागेल.
- ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग, महापालिका

ICC ODI Rankings 2025: आयसीसी ‘वनडे’ रँकिंग जाहीर! रोहित शर्मा अव्वल क्रमाकांवर कायम; ‘टॉप–10’मध्ये भारताचे चार 'बॅट्समन'

Electricity Short Circuit : 'वीजस्पार्कने पेटले स्वप्नांचे शेत'; उसाला आग, दहा ते बारा एकर उसाचे जळून खाक

Guava Fruit Tips: पेरू आरोग्यासाठी चांगला, पण 'या' 5 लोकांसाठी ठरू शकतो धोकादायक

Pimpri Chinchwad Crime : चिंचवडमध्ये गुटख्याचा मोठा साठा जप्त; चिखली पोलिसांची कारवाई, एकाला अटक!

Delhi Blast: दहशतवाद्यांकडे होती आणखी एक कार? i20 नंतर लाल रंगाच्या EcoSportच्या शोधात पोलिस

SCROLL FOR NEXT