रेल्वे पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य
चिंचवड स्टेशन कडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावर खूप खड्डे आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. कृपया प्रशासनाने याची दखल घेत संपूर्ण पूल दुरुस्त करावे.
-पी. बी. पवार, चिंचवड
भक्ती शक्ती परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर कर्मचारी ग्राहकांकडून थेट स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाइन पैसे घेत असल्याचे उघड झाले आहे. पेट्रोल पंपावर विश्वास ठेवून लोक पैसे देतात. कृपया ग्राहक संरक्षण विभागाने लक्ष द्यावे.
-सुजित पवार, निगडी